सडक अर्जुनी : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानांतर्गत येत असलेल्या कोहमारा गावाजवळील जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना भ्रमंती करण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय वनात पर्यटकांना जाण्यासाठी १५ जूनपर्यंत मोकळीक असते. १५ जून नंतर राष्ट्रीय उद्यान बंद केले जाते. बकी गेट मार्गे राष्ट्रीय उद्यानात गेल्यास झलकार गोंदी तलाव, जांभुळझरी, तेलनझरी, कलईझरी, आंबेझरी, शेंडापाळ, महादेव, पहाडी, चोपन बोटवेल, कमकाझरी या मार्गे गेल्ळास हमखास हरण, सांबर, चितळ, ससे, रानगवा, रानगाय, भेडकी, अस्वल, रानकुत्रे, रानडुक्कर, निलगाय, बिबट, मोर आदी वन्यप्राणी पाहावयास मिळतात. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलातील पाणवठे व झनकारगोंदी तलाव याठिकाणी वन्यप्राण्यांचे झुंडच्या झुंड पहावयास मिळतात. तालुक्यालगत असलेल्या पितांबरटोला या गेटवरुन जाताना धोबेझरी, बोंडगावजवळ लालझरी, लिंक रोड याही मार्गे जाताना विविध प्राणी पहावयास मिळतात. गाईडच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची ओळख, औषधी वनस्पतींची ओळख पटवून दिली जाते. राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बागडे, रमेश दोनोडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वनाविषयी व वन्यप्राण्यांविषयी माहिती द्यावी व पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
वनपर्यटनासाठी उरले केवळ तीन दिवस
By admin | Updated: June 13, 2015 00:54 IST