शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

एकमेव ‘स्टेडियम’ची दुरवस्था

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे.

खेळाडूंपुढे सरावाचा प्रश्न : नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गोंदिया : शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे. परंतु संकुलातील स्टेडियम व मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. यामुळे शहरातील खेळाडूंसमोर ‘सराव’ करावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील खेळाडूंसाठी सुविधायुक्त व सुसज्ज असे क्रीडा संकुल व्हावे, यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नगर पालिकेने इंदिरा गांधी स्टेडियमची निर्मिती काही वर्षापूर्वी केली. या स्टेडियममध्ये आजवर विविध क्रीडा प्रकारातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. शहरातील खेळाडूंनाही या स्पर्धांपासून प्रोत्साहन मिळाले. शहरातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात राज्य व देशपातळीवर शहराचे नाव नेले. एकंदरित शहरात खेळांना प्रोत्साहन व खेळाडू निर्माण करण्याचे काम इंदिरा गांधी स्टेडियमने केले आहे. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमच्या वैभवाला उतरती कळा लागल्याचे दिसते. स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यात स्टेडियममध्ये चिखल साचतो, या चार महिन्यात खेळाडूंसमोर सरावाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. स्टेडियममध्ये जमलेले पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. क्रीडा संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पावसाचे पाणी जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नाली बांधकाम सुरू आहे. परंतु या बांधकामाच्या नावावर केवळ खोदकाम झाले असून पक्के बांधकाम थंडबस्त्यात पडले आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही खेळाडूंना स्टेडियममध्ये सराव करता येत नाही. तसेच स्टेडियमच्या पायऱ्या तुटलेल्या असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ गोंदिया’ अभियानांतर्गत स्टेडियमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परंतु त्यानंतर सर्वांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे याच स्टेडियमवर सराव करुन अनेक खेळाडू, सैन्य, पोलीस विभाग व विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमची दुरवस्था झाल्याने आता खेळाडूंना शहराबाहेर दुरवरील तिरोडा, बालाघाट, आमगाव व तिरोडा राज्य मार्गावरील खुल्या जागेत सराव करावा लागत आहे. स्टेडियमच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच बातम्या प्रकाशित केल्या तर क्रीडा संघटना स्टेडियमची दुरवस्था दूर करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. परंतु ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींना या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. मैदानाची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी हिरवळ कधी लागणार असे खेळाडूंना वाटत आहे. या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. परिणामी सराव करण्यात अडचण येत आहे. नाल्यांचे बांधकाम कधी होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)