शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासानेच प्रगतीचे शिखर गाठता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:25 IST

शालेय जीवनात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आशावादी जीवन जगून उच्च ध्येय मनाशी बाळगावे. स्वत:ची तुलना इतरांशी न करता विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी.

ठळक मुद्देप्रशांत गाडे : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : शालेय जीवनात वावरत असताना विद्यार्थ्यांनी आशावादी जीवन जगून उच्च ध्येय मनाशी बाळगावे. स्वत:ची तुलना इतरांशी न करता विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी. भविष्यात मोठ्या पदावर आरुढ होण्याची अभिलाषा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रखर आत्मविश्वास विद्यार्थ्यानी बाळगावे. कारण आत्मविश्वासानेच प्रगतीचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी प्रशांत गाडे यांनी केले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी मानवता विद्यालयाचे भाग्यवान फुल्लुके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अशोक रामटेके, संतोष टेंभुर्णे, अनिरुद्ध रामटेके, एकनाथ रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना गाडे यांनी, आजचा विद्यार्थी हा चौकस बुद्धीचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी नाही. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्यामधील न्यूनगंड काढावा. नकारात्मक विचाराला विद्यार्थ्यांनी स्थान देऊ नये. यशाचे परमोच्च शिखर गाठण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यानी इयत्ता ५ वी पासून तयारी करावी. नित्यनेम अभ्यास केल्यास वयाच्या २२ व्या वर्षी जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे सांगितले.संचालन अमरचंद ठवरे यांनी केले. प्रास्ताविक भाग्यवान फुल्लुके यांनी मांडले. आभार भारत उके यांनी मानले.शिबिरात गावातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनो अवांतर वाचन कराशिबिरात मार्गदर्शन करीत असतानाच गाडे यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्सही दिल्या. यात त्यांनी, स्वत:ला कमी लेखू नये व ध्येय लहान वा कमी ठेवणे हा गुन्हा आहे. आपल्याला काही वेगळे करुन दाखवायचे आहे तर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यालयीन स्तरापासून तयारी करावी. जिद्द, चिकाटी, नियोजनामुळे मोठ्या संकटावर मात करता येते. सुसंस्कारीत भाग्य लाभण्यासाठी चांगल्या मित्राची निवड करा. चिंतन, मनन अवांतर वाचन करण्याचा सल्ला गाडे यांनी दिला.