शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बाधित आणि मात करणारेच सेम सेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०वर आली असून चार तालुके ...

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०वर आली असून चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर गुरुवारी (दि.२९) १ बाधितांनी मात केली तर १ रुग्णाची भर पडली. त्यामुळे बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या सेम सेम होती.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी १५८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १०९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ४९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६३ टक्के आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या पृूर्णपणे आटोक्यात आली असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१६६९६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. तर २१७३५० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४११८७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०४७६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १० कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

..................

दुसऱ्या डोससाठी वेटिंग लिस्ट

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८४२४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ४६३४७० नागरिकांना पहिला, तर १२०७७५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तर वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे.

...........