शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:23 IST

मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही.

ठळक मुद्देसाधना भारती : ‘बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत मोर्चा व धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही. आज मुले व्यसनाच्या आहारी जाऊन आपले शरीर, मन व जीवनच उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे मुलींचे जीवन नष्ट होत असून मुलांना व्यसनापासून वाचविणे अत्यावश्यक झाले आहे. मुले वाचतील तरच मुली वाचणार, असे प्रतिपादन बेटा बचाव राष्टÑीय अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बासिडर साधना भारती यांनी केले.येथील उपविभागीय कार्यालयासमोर आयोजीत धरणे आंदोलनात शुक्रवारी (दि.३) बेटा बचाव राष्टÑीय अभियानाची माहिती देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाचे अध्यक्ष ईश्वर उमरे, प्रवक्ता शिव नागपुरे, मंजू बैरागी, सरिता वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, महेंद्र बघेले व इतर उपस्थित होते.पुढे बोलताना भारती यांनी, आजच्या काळात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते. मात्र शासन व्यसनबंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन कोणत्याही पक्षाचे असो, व्यसनाशेमुळे समाज व महिलांचा काहीही लाभ होत नाही. व्यसनांमुळे मुलांचा मृत्यू होत असतानाही शासन या विषयावर कठोर पाऊल उचलत नाही. देशात ९० टक्के गुन्हे व्यसनांमुळे होतात. मुली व महिलांवर अत्याचार, बलात्कार, घटस्फोट, विधवा आदी प्रकाराला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगीतले.विशेष म्हणजे, या आंदोलनांतर्गत शहरात रॅली काढण्यात आली होती. शहरातील बाजारभागासह मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत महिलांसह मोठ्या संख्येत विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या.दिल्ली येथे आंदोलनाचा इशाराबेटा बचाव राष्टÑीय अभियानाची रूपरेखा व्यक्त करताना साधना भारती म्हणाल्या, अभियानाच्या सुरूवातीला आम्ही महाराष्टÑ, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या चार राज्यात सदर अभियान राबवित आहोत. त्यातही सुरूवातीला महाराष्टÑातील गोंदिया व नागपूर तर मध्य प्रदेशातील बालाघाट व शिवनी या चार जिल्ह्यांमध्ये बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत विराट रॅली व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना व्यसनमुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात येतील व सर्वदलीय बैठक संसदेत आमंत्रित करण्याची मागणी केली जात आहे. तसेच गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. जर शासनाने २६ जानेवारी २०१९ पर्यंत संपूर्ण व्यसनांवर बंदी लावली नाही तर दिल्ली येथे जंतर मंतर परिसरात नशाबंदीसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला.