शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:27 IST

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्यानंतर एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा विषयक निकषांकडे बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : बहुतेक एटीएमएम मध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्तीच नाही

अंकुश गुंडावार/कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्यानंतर एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षभरापूर्वी आंध्रप्रदेशातील एका एटीएममध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयान सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका व्यवस्थापनाला दिले होते. मात्र या आदेशाची सुद्धा सर्रासपणे पायमल्ली केली जात असून गोंदिया शहर व जिल्ह्यातील बहुतांश एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचाच वॉच असल्याची धक्कादायक बाब लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघडकीस आली.धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा दिली आहे. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एटीएम देखील सुरक्षीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापल्याची घटना घडली. या घटनेनंतर एटीएम व एटीएममधून पैसे काढणे किती असुरक्षीत आहे याची प्रचिती शहरातील काही एटीएमला भेट देवून पाहणी केल्यानंतर निदर्शनास आली. शहरातील एटीएम किती सुरक्षीत आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ टीमने गुरूवारी (दि.२१) रात्री शहरातील एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता बहुतेक एटीएम मध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटिव्हीच्या निगरानीत असल्याचे आढळले.एटीएम शहरातील मुख्य परिसरात असल्याने त्यांना फोडण्या सारख्या घटना घडणे तेवढेही शक्य नसल्याचे दिसले. मात्र बँक आॅफ महाराष्ट्रचे दुर्गा चौकातील दुर्गा मंदिराच्या बाजूला असलेले एटीएम सुरक्षेच्या निकषांत बसत नसल्याचे दिसले. येथे गार्ड नसल्याने कुणीही या मशीन वापरा व निघून जा असे चित्र दिसले. या शिवाय स्टेट बँकेच्या मुख्य शाखे लगत असलेले एटीएम सुरक्षारक्षका विनाच दिसले. बाजारातील एक्सीस बँक, इलाहाबाद बँक यांचेही एटीएम दिवसाच काय रात्रीलाही सुरक्षा रक्षकाविना असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. तर काही बँकाच्या एटीएममध्ये दिवसा व रात्रीही गार्ड असल्याचे असल्याचे आढळले.अन्य बँकांना सीसीटीव्हीचाच आधारजिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयटीआयसीआय व एक्सीस बँकेच्या एटीएमला सीसीटिव्हीचाच आधार असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटिव्ही लागलेले असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, एटीएम मशीन्सची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतानाच एटीएममध्ये गुन्हेगारीचे प्रकारही घडत आहेत. अशात एटीएम व ग्राहक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही हा एकमेव पर्याय किती सुरक्षीत आहे हा मात्र प्रश्न सर्वांना पडत आहे.आयडीबीआयच्या एटीएममध्ये गार्डची व्यवस्थाआयडीबीआय बँकेच्या जिल्ह्यात चार शाखा असून त्यांचे पाच ठिकाणी एटीएम आहेत. यात शहरातील बँक कार्यालयात दोन एटीएम असून अन्य तीन अन्य शहरांत आहेत. आयडीबीआय बॅॅँकेच्या सर्वच एटीएमच्या सुरक्षेसाठी गार्डची व्यवस्था असल्याचे बँकेचे व्यवस्थापक विक्र म बोराडे यांनी सांगितले. आमच्या बँकेचा नियमच असून सर्वच एटीएमला गार्ड असल्याचेही त्यांनी सांगीतले.

टॅग्स :atmएटीएम