शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तिजोरीत फक्त ५,३१० रूपये

By admin | Updated: July 1, 2014 01:33 IST

शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. पक्ष प्रमुख येणार असल्याने जिल्हा शिवसेनेने त्यांचे जंगी स्वागत केले. यासाठी शहरात बघावे तिकडे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मोजावे

शहर होर्डिंग्समय : शिवसैनिकांनी कर टाळलागोंदिया : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. पक्ष प्रमुख येणार असल्याने जिल्हा शिवसेनेने त्यांचे जंगी स्वागत केले. यासाठी शहरात बघावे तिकडे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मोजावे तर लाखो रूपयांचे फक्त होर्डींग्स लावण्यात आल्याचे दिसले. त्यापैकी मोजक्याच होर्र्डिंग्सचे पैसे नगर पालिकेला कराच्या रूपात मिळाले.या होर्डिंग्जयुद्धात नगर परिषदेला बराच कर मिळणे अपेक्षित होते. पण हा कर बुडवून कार्यकर्त्यांनी होर्डींग्सच्या मोबदल्यात पालिकेत फक्त पाच हजार ३१० रूपयांचा कर भरला असल्याचे दिसून आले. त्यामुळे लाखो रूपयांच्या या उलाढालीत पालिकेच्या तिजोरीत मात्र पाच हजारच आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने फुंकल्याचे मानले जाते. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: येणार असल्याने येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला होता. बघावे तेथे शिवसेनेचे होर्डिंग्स लावण्यात आल्याचे दिसले. वास्तविक अवघे शहरच भगवे झाल्याचे बघावयास मिळाले. लाखो रूपयांचा खर्च यासाठी जिल्हा शिवसेनेने केला असल्याचे उघड आहे. शहरातील मोक्याची एकही जागा सुटलेली दिसून आली नाही. शिवसेनेने शहरात लावलेल्या या होर्डींग्सची मोजणी केली असता शेकडोंच्या संख्येत त्यांची गणती होऊ शकते. शिवसेनेने आपल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंना तर खुश करून घेतले. यातून मात्र पालिकेला चांगलाच तोटा सहन करावा लागला आहे. असे असतानाही नगर परिषदेने मात्र कोणावरही दंड आकारला नाही.शहरात लावण्यात येणाऱ्या या होर्डींग्सच्या मोबदल्यात प्रत्येकालाच पालिकेत कर भरावा लागतो. त्यानुसार शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सुद्धा पालिकेत कर भरला. मात्र शेकडो होर्डींग्सच्या मोबदल्यात भरण्यात आलेला हा कर तुटपुंजा आहे. यात राजकुमार कुथे यांनी दोन हजार ९१० रूपयांचा तर मुकेश शिवहरे यांनी दोन हजार ४०० रूपयांचा कर भरल्याचे नगर परिषदेतून सांगण्यात आले. वास्तविक शहरात लावण्यात आलेल्या या होर्डींग्लची मोजणी केली असता नगर परिषदेला चांगलीच रक्कम कर स्वरूपात मिळायला हवी. मात्र फक्त पाच हजार रूपये पालिकेच्या तिजोरीत भरण्यात आल्याने नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात नेहमीच होर्र्डिंग्सचे युद्ध पेटलेले असताना नगर परिषद अजूनही यावर गांभिर्याने कारवाई करताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)