शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांसाठी केवळ १० शौचालयांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:47 IST

कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात.

ठळक मुद्देउघड्यावर शौच व अंघोळ : प्रशासनाची मात्र डोळेझाक

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कचारगडच्या रुपात सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याला मोठा सांस्कृतीक व ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी आपले पारंपरिक व सांस्कृतिक अनुष्ठान पार पाडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाजबांधव येथे येतात. धनेगावच्या परिसरात राष्ट्रीय महासंमेलन व राष्ट्रीय गोंडीयन सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्या आदिवासींची संख्या लाखोच्या घरात असते.पाच दिवस हा महोत्सव चालतो. त्यामुळे पाचही दिवस भाविक उपस्थित राहतात. मात्र याठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी सुविधांचा अभाव असून लाखो भाविकांसाठी केवळ १० शौचालये आहेत. तर स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने भाविकांना उघड्यावरच आंघोळ करावी लागते.कचारगड देवस्थान गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी धनेगाववरुन ३ कि.मी.चा प्रवास असून या दरम्यान स्वच्छतागृह व शौचालय उपलब्ध नाही. धनेगाव येथे संमेलन परिसरात एकूण आठ शौचालय आणि प्रसाधनगृह पडक्या स्वरुपात आहेत. तसेच धनेगावच्या टेकडीवर भोजन वाटप परिसरात दोन स्नानगृह व दोन शौचालयाची व्यवस्था आहे. असे एकूण दहा शौचालय व स्नानगृहाची सोय आहे. परंतु कचारगड यात्रेदरम्यान पाच दिवस प्रत्येक दिवशी लाखोच्या संख्येत भावीक येथे मुक्कामी असतात. अशात त्यांना प्रात: विधी करण्यासाठी शौचालय व स्नानगृहाची गरज असते. परंतु त्यांना येथे ही सोय उपलब्ध होत नाही. धनेगाव हे एक छोटेसे आदिवासी गाव असून या गावात गरीब मोलमजुरी करणारे लोक राहतात. येथील स्थानिक लोक सुद्धा लाखो भाविकांना सोयी उपलब्ध करुन देण्यास असमर्थ आहेत. अशात बाहेर प्रातांतून आलेल्या भाविकांना मोफतच नाही तर पैशाने सुद्धा मुलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. याकडे मात्र मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.आवश्यक सोईसुविधांचा अभावकचारगड यात्रे दरम्यान येणाºया भाविक महिला-पुरुषांना अंघोळीसाठी स्नानगृह व शौचालय उपलब्ध होत नसल्याने त्यांना जंगलातच उघड्यावरच शौचास जावे लागते. तसेच अंघोळ सुद्धा उघड्यावर करावी लागते. हे येथे येणाऱ्या भाविकांचे दुर्देवच म्हणावे लागेल. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये अधिकारी कर्मचारी आणि प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असतो. परंतु येथे त्यांना आवश्यक सोईसुविधा मिळत नाही.३० ठिकाणी तात्पुरते शौचालयशासनाच्यावतीने शौचालयाच्या सोयीबाबत माहिती घेतली असता बांधकाम विभागाच्या एका अभियंताने धनेगाव येथे खालील परिसरात १५ व वरच्या परिसरात १५ असे एकूण ३० ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थान