शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रबी हंगामातील ऑनलाइन नोंदणीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ६६ हजार हेक्टरवर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी या विभागाने सातबारा या विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगितले होते.

ठळक मुद्देअन्न व पुरवठा विभागाचे आदेश : शेतकऱ्यांना दिलासा, प्रफुल पटेल यांची चर्चा

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन सातबारा नोंदणी करण्याची मुदत होती; पण कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन करता आला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाने बुधवारी (दि.१९) धान विक्रीसाठी ऑनलाइन सातबारा नोंदणीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ६६ हजार हेक्टरवर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी या विभागाने सातबारा या विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगितले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन नोंदणी करता आला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी चार दिवसांपूर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवीत मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बुधवारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने रबी धानाची विक्री शासकीय धान खरेदी केंद्रावर करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा ३१ मे पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. यामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रबी धान खरेदी त्वरित सुरू करण्यासाठीसुद्धा खा. प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन प्रयत्नरत आहेत.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलagricultureशेती