शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलने लावला मुलांना चष्मा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मुलेही घरातच आहेत. यामुळे त्यांना घरातच ...

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मुलेही घरातच आहेत. यामुळे त्यांना घरातच आपला विरंगुळा म्हणून मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही हीच साधने उरली आहेत. त्यात शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरीही ऑनलाईन शिक्षणाने त्याची जागा घेतली असून, यामुळे मुलांना क्लासेससाठी मोबाईलवर लागून राहावे लागत आहे. यामुळे आता मात्र त्यांना डोळ्यांची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय घराबाहेर जाता येत नसल्याने ते दिवसभर मोबाईलवर गेम खेळतात. मोबाईल लागून राहात असल्याने मुलांना डोळ्यांचा थकवा, डोकेदुखी व चष्मा लागणे आदी त्रास होत आहेत. कित्येक मुलांना लहानपणापासूनच चष्मा लागत असल्याचे दिसत असून, यामुळेच आता मुलांच्या या समस्या पालकांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. अशात यावर वेळीच आपल्या डॉक्टरांशी बोलून उपचार करण्याची गरज आहे.

---------------------------------

लहान मुलांना हे धोके

- सतत मोबाईलवर लागून राहिल्याने डोळे शुष्क होतात, पाणी येते, लाल होतात.

- मायोपिया असलेल्या मुलांचा चष्म्याचा नंबर वाढतो.

- सतत मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर लागून राहिल्याने डोके दुखते.

- सतत मोबाईल पाहात राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो.

----------------------------------

लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली

१) दिवसभर मोबाईल हाती घेऊन बसत असल्यामुळे डोळे व त्यातून डोक्यावर ताण येत असून, यामुळेच डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे.

२) मोबाईल हाती असताना आपल्या पापण्या मिचकविण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे डोळे शुष्क होऊन अन्य तक्रारी वाढतात.

३) मोबाईल जवळ धरून ठेवत असल्यामुळे जवळ बघण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे डोळ्यांच्या अन्य हालचाली होत नसून, स्नायूंवर त्याचा परिणाम होतो.

-------------------------------------

पालकही चिंतेत

कोरोनामुळे मागील वर्षापासून मुले घरातच असून, त्यांना बाहेर जाणे बंद केले आहे. अशात दिवसभर घरात राहून ते वैतागल्याने सतत मोबाईल, टीव्ही व कॉम्प्युटरवर लागून असतात. त्यात आता शाळा बंद असल्याने ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास सुरू आहे. म्हणजेच, त्यासाठीही सतत मोबाईलवर लागून राहावे लागत आहे. यामुळे मात्र मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या आता वाढत आहेत.

- दीपक मेश्राम

---------------------------------

कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून शाळा बंद आहेत. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे लहान मुलांना घराबाहेर जाऊ देण्यावर बंदी लावण्यात आली आहे. यामुळे ते घरातच असून, मोबाईल व टीव्हीवर आपला दिवस घालवतात. आता ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने त्यांना मोबाईलवरच शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे मात्र त्यांना डोळ्यांचा थकवा, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत.

- पवन शिंदे

------------------------------

कोट

सतत मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टीव्हीसमोर बसून असल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांचा त्रास वाढत आहे. यासाठी सतत मोबाईलवर लागून न राहता मधामधात डोळे बंद करून ठेवावे किंवा उघड-बंद करावे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी एंटी ग्लेअर ग्लासेस लावावे किंवा लॅपटॉप असल्यास त्याला एंटी ग्लेअर ग्लास लावावे. तरीही त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- डॉ. कविता एस. भगत, नेत्ररोग तज्ज्ञ, गोंदिया.