शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन लिलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:29 IST

तालुक्यातील शेतकºयांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी. शेतमाल विक्री करताना दलालांची मध्यस्थी बाजूला सारून.....

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम : ई-नाम योजनेंतर्गत ४५ क्विंटल धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यातील शेतकºयांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी. शेतमाल विक्री करताना दलालांची मध्यस्थी बाजूला सारून शेतकºयांना त्यांचा शेतमालाची कुठेही विकण्याची मुभा मिळण्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यातर्फे राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेंतर्गत आॅनलाईन धान खरेदीला बाजार समितीच्या मुख्य यार्डात सुरूवात करण्यात आली.प्रथमच करण्यात आलेल्या धान खरेदीच्या आॅनलाईन लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती काशिफजमा कुरैशी यांच्या हस्ते उपसभापती लायकराम भेंडारकर व परवानाधारक व्यापाºयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तावशी (खुर्द) येथील गणेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजने शुभारंभाप्रसंगी ४५ क्विंटल धान आॅनलाईन पध्दतीने खरेदी केले.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकमेव अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, तालुका सहायक निबंधक भानारकर, बाजार समितीचे प्रभारी सचिव अशोक काळबांधे, मंडी अ‍ॅनालिस्ट रंगनाथ कटरे यांच्या उपस्थितीत शेतकरी, व्यापारी, अडते यांची दोनदा कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे.ही योजना राबविण्यासाठी शासनातर्फे पायाभूत सुविधांसाठी १० संगणक संच, १० युपीएस, १ एलईडी, ४ प्रिंटर, २ टॅब, १ वेब कॅमेरा इत्यादी साहित्य बाजार समितीला उपलब्ध करुन देण्यात आले.आॅनलाईन मिळणार सौदा पट्टीयापुढे मार्केट यार्डमधील धानाचा लिलाव, मालाची नोंदणी, सौदा पट्टी ई-नाम प्रणालीद्वारे प्राप्त होणार आहे. यामध्ये अडते, व्यापाºयांनी सहभागी व्हावे, शेतमालाचे ग्रेडींग करुन अपलोड केले जाणार आहे. सदर व्यवहारामध्ये पारदर्शकता व शेतमालाला चांगला भाव मिळावा हा एकमेव उद्देश आहे.आधारकार्ड व बँक पासबुक आवश्यकशेतमालविक्रीस आणताना प्रवेश द्वारावर नोंदणी करण्याकरीता बँक पासबुक व आधारकार्डची सत्यप्रत सोबत आणून आॅनलाईन लिलाव पध्दतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सभापती कुरैशी व सचिव काळबांधे यांनी केले आहे.