शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

खून प्रकरणात एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: March 5, 2016 01:58 IST

लहान भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जिल्हासत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया : लहान भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जिल्हासत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी शुक्रवारी (दि.४) प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केली. बुधराम देवाजी टालटे (६०) रा. सालेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १३ नोव्हेंबर २०१२ आपला धाकटा भाऊ तुळशीराम टाकळे (५२) याच्या डोक्यावर काठीने मारून ठार केले. आरोपींच्या मोठ्या आईने एक एकर जमीन दोन्ही भावांना दिली होती. ती जमीन मुलीच्या लग्नासाठी मृतक तुळशीरामने ६० हजारात विक्री केली. ते पैसे लग्नात खर्च केले. त्या जमीनीचे अर्धे पैसे आम्हाला दे म्हणून आरोपी बुधराम देवाजी टालटे (६०) व त्याची पत्नी पारबता बुधराम टालटे (५५) या दोघांनी त्यांच्याशी भांडण करून पारबताने तुळशीरामचा हात पकडून ठेवला तर बुधरामने काठीने डोक्यावर मारले. यात तुळशीरामचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी केला. १३ नोव्हेंबर २०१२ हा दिवाळीचा दिवस असतांना पूजा-अर्चनेनंतर तुळशीराम व त्यांचे कुटुंबीय जेवण करीत असताना आरोपी बुधराम व त्याची पत्नी पारबता वाद करायला आली. यात काने मारल्याने तुळशीरामचा मृत्यू झाला. तुळशीरामचा खून करण्याचा बुधरामचा मानस नसल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आली. या प्रकरणात १० साक्षदार तपासल्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने पारबताला निर्दोष ठरवित बुधरामला कलम ३०४ (२) नुसार एक वर्षाची शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅण्ड. प्रशांत डोये यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रमुख महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)