शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भूमापन अधिकाऱ्यास एक हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माहिती आधिकारात मागण्यात आलेली माहिती विहित मुदतीत न पुरविल्यामुळे राज्य माहिती आयुक्तांनी भूमापन अधिकाºयांना एक हजार रूपयांचा दंड ठोठावला.प्राप्त माहितीनुसार, येथील आरटीआय व सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६ (१) अन्वये १३ एप्रिल २०१७ रोजी भूमि अभिलेख कार्यालयातील जनमाहिती अधिकारी ...

ठळक मुद्देमाहिती आयुक्तांचे आदेश : मुदतीत माहिती न देणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माहिती आधिकारात मागण्यात आलेली माहिती विहित मुदतीत न पुरविल्यामुळे राज्य माहिती आयुक्तांनी भूमापन अधिकाºयांना एक हजार रूपयांचा दंड ठोठावला.प्राप्त माहितीनुसार, येथील आरटीआय व सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६ (१) अन्वये १३ एप्रिल २०१७ रोजी भूमि अभिलेख कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांना माहितीचा अर्ज सादर करून मौजा देवरीच्या ग्रामपंचायत व नगर पंचायत हद्दीत येणाºया ले-आऊटमध्ये प्रत्यक्ष जागेवर करण्यात आलेल्या अभिन्यास आरवणीची माहिती मागितली होती. मात्र त्यांच्याकडून विहित मुदतीत कोणतीच माहिती न पुरविता तसेच अपिलिय अधिकारी यांच्याकडून सुद्धा कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे जैन यांनी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूरकडे १९ आॅगस्ट २०१७ रोजी द्वितीय अपील दाखल केली.त्या अनुषंगाने २ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्य माहिती आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावनी दरम्यान जनमाहिती अधिकारी यांच्याकडून अपिलार्थीस माहिती देण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी जनमाहिती अधिकारी यांना अशाप्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये यासाठी समज देण्यात आली.तसेच अपिलार्थिस माहिती मिळविण्यासाठी झालेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी माहिती अधिकार अधिनियमातील कलम १९ (८) (ख) नुसार एक हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले.सदर नुकसान भरपाईची रक्कम सार्वजनिक प्राधिकरणाने सदर आदेश प्राप्त होताच १५ दिवसांत आपिलार्थिस धनादेशाद्वारे अदा करावे असे आदेशित करुन प्रस्तुत द्वितीत अपील निकाली काढण्यात आली.राज्य माहिती आयुक्ताच्या या आदेशामुळे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे उल्लघंन करणाºया व विहित मुदतीत माहिती न देणाºया तसेच मागितलेली माहिती न पुरविता चुकीची माहिती पुरविणाºया जनमाहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी यांचे धाबे दणाणले आहे.