शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘कॅशलेस’साठी महावितरणचे एक पाऊल पुढे

By admin | Updated: January 21, 2017 00:15 IST

व्यवहारांत पारदर्शकता यावी या दृष्टीने शासनाने ‘कॅशलेस’ व्यवहारांवर आता जोर देत अवघ्या देशभर हा फंडा सुरू केला आहे.

मोबाईल अ‍ॅपमध्ये सुधारणा : एका क्लिकवर मिळताहेत सर्व सुविधा गोंदिया : व्यवहारांत पारदर्शकता यावी या दृष्टीने शासनाने ‘कॅशलेस’ व्यवहारांवर आता जोर देत अवघ्या देशभर हा फंडा सुरू केला आहे. याला देशातून प्रतिसाद मिळत असतानाच महावितरणनेही यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणने आणलेले मोबाईल अ‍ॅप आता एक सवय होत चालले असून एका क्लिकवर वीज ग्राहकांना यातून सर्व सुविधा मिळत आहेत. आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास रोख व्यवहारांमध्ये पारदर्शकता नव्हती. परिणामी कित्येकांकडून कर चोरी केली जात होती व त्याचा फटका शासनासह देशवासीयांना बसत होता. यावर आळा बसावा व सर्व व्यवहारांत पारदर्शिता यावी या दृष्टीने शासनाने आता ‘कॅशलेस’ ही नवीन पद्धत अंमलात आणली आहे. यांतर्गत होणारे सर्व व्यवहार आता नजरेत येणार असल्याने शासनासह जनतेचाही यात फायदा होणार आहे. परिणामी सर्वच विभागांकडून आता ‘कॅशलेस’चे स्वागत करण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. अशात आपण का मागे रहावे असा विचार करीत महावितरणनेही आपले मोबाईल अ‍ॅप आणले आहे. सुरूवातीला वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप क्लीष्ट असल्याच्या तक्रारीही होत्या. मात्र आता त्यात आवश्यक ते अपटेड करून ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी परिपूर्ण करण्यात आले आहेत. या अ‍ॅपमधून एका क्लीकवर आता वीज ग्राहकांना महावितरणच्या सर्व सुविधांचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आता दिवस व वेळ बघण्याची गरज पडणार नाही. शिवाय कधीही व कोठूनही आपले बील भरता येणार असून स्वत:शी निगडीत सर्वच माहिती याअ‍ॅप मधून जाणून घेता येणार आहे. अ‍ॅपचा हाच फायदा घेत आता मोबाईल अ‍ॅपद्वारे बील भरणा करून सोबतच स्वत:च्या कनेक्शनबाबत वीज ग्राहक जाणून घेत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही आता बहुतांश जणांकडे मोबाईल उपलब्ध असल्याने एकाच्या मोबाईलवरून दुसराही फायदा घेऊ शकणार आहे व ते होत असल्याचेही दिसते. परिणामी ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी महावितरणचे हे पाऊल फायद्याचे ठरत असल्याचेही दिसत आहे. (शहर प्रतिनिधी) मोबाईल अ‍ॅप अत्यंत सुटसुटीत असून अ‍ॅपमुळे ग्राहकांना आता वीज बील भरण्यासाठी दिवस व वेळ बघावा लागणार नाही. कधीही व कुठूनही ग्राहकांना अ‍ॅपच्या माध्यमातून बील भरता येणार आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी अ‍ॅपचा वापर करावा. - एल.एम.बोरीकर अधीक्षक अभियंता, गोंदिया