सुगावा लागला : सावनेरच्या ताराचंद तांडेकरला होणार अटकगोंदिया : चंदन तस्करी करणाऱ्या टोळीतील आरोपी उत्तरप्रदेशातील कन्नज जिल्ह्यातील हाजीगंज येथील मो. फैयाज मो. सरदार अंसारी व राम गोपाल बनकर रा. बगडमारा ता. किरणापूर जि. बालाघाट या दोघांना शुक्रवारी दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायाधीश ए.एस. जरोदे यांनी त्या दोन्ही आरोपींना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेवरील कोरणी नाक्यावर गुरूवारच्या सकाळी ९ वाजता मोटारसायकल एम.पी. ५० एमजी ३०१५ व एमएच ४० व्ही ९२२१ या दोन वाहनांवर ६१ किलो चंदन पकडण्यात आले. यात या दोघांना अटक करण्यात आली. तर एमएच ३१ डी.आर ३३५५ हे वाहन घेऊन तिघे पसार झाले. वनाधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीण परिवहन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता सदर वाहन सावनेर येथील ताराचंद तांडेकर या व्यक्तीच्या नावे सल्याची माहिती पुढे आली. त्यालाही या गुन्ह्यात अटक करणार असल्याची माहिती वनाधिकारी आनंद मेश्राम यांनी दिली. नागपूरच्या हसनबाग येथे अंसारी भाड्याने राहात असल्याने वनाधिकाऱ्यांनी त्याच्या खोलीवर जाऊन झळती घेतली. त्या ठिकाणी चंदनाचे अत्तर आढळले. ते अत्तर गोंदिया, भंडारा व नागपूर येथे विकत असल्याची माहिती अंसारी याने दिली. या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यालाही अटक करण्याची तयारी वनाधिकाऱ्यांची आहे. (तालुका प्रतिनिधी)
चंदन तस्करांना एक दिवसाचा एफसीआर
By admin | Updated: September 10, 2016 00:14 IST