शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या मजुरांना जुन्याच कामांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:44 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुन्याच आर्थिक वर्षांतील कामांचा मजुरांना आधार होत आहे.

ठळक मुद्देनवीन कामांचे नियोजन नाही : दोन महिने करावी लागणार प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुन्याच आर्थिक वर्षांतील कामांचा मजुरांना आधार होत आहे. ज्या कालावधीत मजुरांना कामांची आवश्यकता असते त्याच कालावधीत कामे सुरु होणार नसल्याने कामाच्या शोधात भटकंती करण्याची वेळ मजुरांवर येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तिरोडा तालुक्यात सद्यस्थितीत ११७ कामांवर १६०० मजूर कार्यरत आहेत. तालुक्यात सध्या सुरू असलेली सर्व कामे ही मागील वर्षांतील असून नवीन कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ही कामे संपल्यानंतर मजुरांना पुन्हा कामाच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे. तलाव खोलीकरणाची चार कामे सुरू १६ मजूर कार्यरत आहेत. नाला सरळीकरणाची दोन कामे सुरू असून ६०५ मजूर कार्यरत आहे. कालवा दुरुस्ती दोन कामे सुरू असून ५०० मजूर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे २१ कामे सुरू असून ९७ मजूर कार्यरत आहे. तर घरकुल योजनेच्या ७१ कामावर २५२ आणि गुरांचे गोठे तयार करण्याच्या कामावर १६ मजूर १०१ असे एकूण ११७ कामावर १५५१ मजूर कार्यरत आहे.ही सर्व कामे मागील आर्थिक वर्षातील असून २०१९ मधील नवीन कामांना निवडणूक आचारसंहितेमुळे मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. नाला सरळीकरण व कालवा दुरुस्तीचे कामे मागील १५ दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यानंतर शेतीची कामे पूर्णपणे आटोपलेली असतात. त्यामुळे शेतकरी व शेत मजुरांच्या हाताला काम नसते. त्यामुळे या कालावधीत मनरेगाच्या कामांची मजुरांना मोठी मदत होत असते. मात्र यंदा निवडणूक आचार संहितेमुळे ही कामे किमान दोन महिने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मजुरांना कामाच्या शोधात भटकंतीे करावी लागणार आहे.मोजमाप चुकीचेआठवड्यात संपूर्ण कामाचा मोजमाप करुन तशी रोजंदारी ठरविण्याचे अधिकार संबंधित कनिष्ठ अभियंत्याला आहेत. याचाच फायदा हे अधिकारी घेत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, मजुरांकडून काही पैसे सुद्धा घेतले जात असल्याची माहिती आहे. काही कामात कनिष्ठ अभियंता मोजमाप झालेल्या जागेचा पुन्हा मोजमाप रोजी वाढविण्याकरिता करतात. त्यामुळे यासर्व प्रकारांची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.