शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना जुना अन् राईसमिल मालकांना नवीन बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:36 IST

यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : २ लाख ५५ हजार बारदाना उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख क्विंटल धान शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. यंदा ५८ धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी करण्यात येणार आहे.धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला २ लाख ५५ हजार नवीन बारदान उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शेतकºयांना जुने बारदाना देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेताना चांगलीच अडचण होत आहे.दरम्यान काही शेतकऱ्यांनी याची जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे तक्रार सुध्दा केल्याची माहिती आहे.धान खरेदीसाठी नवीन बारदाना उपलब्ध करुन दिल्यानंतरही त्यांना फाटका बारदाना दिला जात आहे.याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा २ लाख ५५ हजार नवीन बारदाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र हा बारदाना राईस मिल मालकांना धान भरडाई करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर फेडरेशनकडे १० लाख जुना बारदाना उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग धान खरेदीसाठी केला जात असल्याचे सांगितले.बारदान्याचा दर निश्चित नाहीजिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत धान खरेदी केली जाते. फेडरेशन शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध करुन देते तर आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून बारदान्यासह धान खरेदी करते. मागील वर्षी १५ रुपये प्रती बारदाना दर निश्चित करण्यात आला होता. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता अद्यापही बारदान्याचा दर निश्चित करण्यात आला नाही. त्यामुळे या आदिवासी विकास महामंडळ आणि शेतकरी या दोघांची अडचण झाली आहे.