शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चर आॅडिटमध्ये जुना उड्डाणपूल फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:30 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देरेल्वे विभाग पाडणार पूल : ६४ कोटींच्या नवीन पुलाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.या पुलावरुन केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवता येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे विभागाने तीन महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र देवून शहरातील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी आणि पुलाच्या दोन्ही बाजुच्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेवून या पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद केली होती.जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर आॅडिट करुन याचा अहवाल आल्यानंतर पुलावरुन वाहतूक सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे ठरविले होते.सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे विभागाच्या तज्ञांकडून या पुलाचे स्ट्रक्चर आॅडिट केले. यात हा पूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वीच उंची कठड्यानंतर पुलावर रुंदी कठडे लावले. तसेच दुचाकी व तीन चाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निणर्याचे सर्रासपणे उल्लघंन केले जात आहे.वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्षजुन्या उड्डाणपुलावरुन केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश असताना या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला वाहतूक नियंत्रण विभागाचे शिपाई कर्तव्यावर असतात मात्र त्यांच्याच डोेळ्यादेखत जुन्या पुलावरुन चार चाकी वाहने धावत आहेत.रेल्वे पाडणार पूलगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल रेल्वे विभाग पाडणार आहे. मात्र उड्डाणपूल पाडण्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा लागणार आहे. रेल्वे विभागाने सहा महिन्यात उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे.६४ कोटी रुपयांच्या नवीन पुलाचा प्रस्तावशहरातील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन उड्डाणपूल बांधकामाचा ६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव व आराखडा शासनाकडे पाठविला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.