शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुना बंद, नवीन सदोषने झाली शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर ५ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. नवीन उड्डाणपुलावरून येण्यासाठी बराच फेरा मारून यावे लागते, तर या पुलावरून पायी ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची व्यवस्था नसल्याने त्यावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूर्ण जीर्ण झाल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तर नवीन पुलाच्या सदोष बांधकामामुळे यावरून वाहतूक धोक्याची झाली आहे. परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना सध्या अंडरग्राउंड परिसरातून वाहतूक करावी लागत आहे. पण हा मार्ग आधीच अरुंद असल्याने या ठिकाणी दिवसभरातून अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे. तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर ५ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. नवीन उड्डाणपुलावरून येण्यासाठी बराच फेरा मारून यावे लागते, तर या पुलावरून पायी ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची व्यवस्था नसल्याने त्यावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिक अंडरग्राउंड मार्गाचा मागील तीन-चार दिवसांपासून सर्वाधिक वापर करीत आहे. पण या मार्गावर सुद्धा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. 

जुना उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात नाही शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हा पूल चार महिन्यांत पाडून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करायची आहे. पण अद्यापही संबंधित कंपनीने पूल तोडण्यास सुरुवात केली नाही तर चार महिन्यांत पूल तोडण्याचे काम पूर्ण अशक्य असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहे. पावसाळ्यात होणार समस्या शहरातील अंडरग्राउंड परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहते. त्यामुळे बरेचदा हा मार्ग बंद असतो. त्यामुळे सध्या या मार्गाने सुरू असलेली वाहतूक कोणत्या मार्गाने करायची? असा प्रश्न आहे, तर नवीन उड्डाणपुलावर सुद्धा यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी