शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जुना बंद, तर नवीन पुलावरून जडवाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:44 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १३ आणि १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवारी (दि.१४) वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीचे काम सुरू : नवीन उड्डाणपुलाची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १३ आणि १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवारी (दि.१४) वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. तर हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी सुरू ठेवल्यास केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. यासंबंधीचे पत्र काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक बोलविली. त्यात जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय नवीन उड्डाणपुलावर पादचारी पूल नसल्याने हा पूल जडवाहतुकीसाठी सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर काय तोडगा काढता येईल, अशी विचारणा जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना केली. त्यात जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन शहरात येणारी जडवाहतुक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला होता. असे केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी होईल तसेच शहरवासीयांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करता या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू राहू द्यावी, अशी मागणी आ.गोपालदास अग्रवाल यांनी प्रशासनाकडे लावून धरली. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत प्रशासनाने जुना उड्डाणपूल हलक्या वाहनासाठी सुरू ठेवला होता.मात्र रेल्वे विभागाने पुन्हा जिल्हा प्रशासनाला पत्र दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. तसेच जुन्या उड्डाणपुलावरून दुचाकी, कार, जीप यांच्याशिवाय इतर जड वाहने जावू नये, यासाठी पुलावर हाईट बॅरियर लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुध्दा सदोष असल्याने तुर्तास या पुलावरुन जडवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जड वाहने बालघाट मार्गावरील बायपास मार्गे वळविण्यात आली आहे.विभागात समन्वयाचा अभावजुन्या आणि नवीन उड्डाणपुलाच्या समस्येवर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी काय करता येईल, यावर उपाय योजना करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. मात्र पुलाच्या दुरूस्ती व हाईट बॅरियर लावण्याची माहिती या विभागाना नव्हती. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला.प्रवाशांना झळशहरातील जुन्या आणि नवीन उड्डाणपुलावरुन बसेस तसेच इतर जडवाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जयस्तंभ चौकात येणाऱ्या प्रवाशांना बायपास मार्गे वळसा घेवून यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याची झळ बसत असल्याने रोष व्याप्त आहे.कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन व्यस्तजुन्या आणि नवीन उड्डाणपुलाच्या समस्येचा सर्वाधिक फटका शहरवासीयांना आणि वाहन चालकांना बसत आहे. मात्र प्रशासन यावर त्वरीत उपाय योजना करण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे चित्र आहे.