शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे.. ११ महिन्यात १११९ जणांना गोंदियात मोकाट कुत्र्यांनी घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:03 IST

Gondia News dogs गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे झुंडचे झुंडच तयार झाले आहेत.

ठळक मुद्देपायी जाणारे नागरिक व गाड्यांच्यामागे धावतात कुत्रीजीव वाचवण्याच्या नादात झाले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे झुंडचे झुंडच तयार झाले आहेत. या कुत्र्यांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमागे एवढेच नव्हे तर वाहनांमागे धावण्याचे प्रकार घडत आहेत. यात चारचाकी वाहनांचे तर ठिक मात्र पायी जात असलेले तसेच दुचाकीने जात असलेल्या नागरिकांसाठी धोक्याची बाब आहे.अशात एखादा व्यक्ती या कुत्र्यांच्या तावडीत आल्यास त्याला कुत्रा चावा घेतात. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी नगर परिषदेकडून बिथरलेल्या व मोकाट कुत्र्यांना मारले जात होते. मात्र कुत्र्यांना मारू नये असा कायदा आल्याने आता नगर परिषदेचे हात बांधल्या गेले आहेत.परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांचा हैदोसही वाढत चालला आहे. मध्यंतरी नगर परिषदेने शहरातील सुमारे २००० कुत्र्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करविली होती. मात्र एवढे प्रमाण पर्याप्त नसल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कुत्रे पकडण्याची व्यवस्था नाहीचनगर परिषदेकडून पुर्वी मोकाट कुत्र्यांना मारले जात होते. मात्र कायद्यानुसार आता कुत्र्यांना मारता येत नाही. परिणामी नगर परिषदेकडून मारण्याचे काम बंद करण्यात आले आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी नगर परिषदकडे व्यवस्था नाही.

वन विभागाची लागते परवानगीकित्येक वर्षांपुर्वी कुत्र्यांना पकडून नेवून जंगलात सोडले जात असल्याची माहिती आहे. मात्र कायदा आल्याने कुत्र्यांना मारता येत नाही. मोकाट कुत्र्यांना पकडून जंगलात सोडताही येत नाही. कुत्र्यांना जंगलात सोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते अशी माहिती आहे. शहरात कुत्रे पकडले जात नाही. शहरातील अंडरग्राऊंड परिसर मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत अत्यधिक धोकादायक बनला आहे. येथे कुत्र्यांचे झुंड नेहमीच दिसून येते. शिवाय मटन मार्केट परिसर, विवेकानंद कॉलनी, छोटा गोंदिया यासह अन्य काही भागांत कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हा परिसर धोकादायक बनला आहे.

सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी नगर परिषद कुत्र्यांना मारत होती. मात्र कायदा आल्याने कुत्र्यांना आता मारता येत नाही. नगर परिषदेकडे कुत्र्यांना पकडून इतरत्र सोडण्याची व्यवस्था नाही. मध्यंतरी शहरातील २००० कुत्र्यांची निबीर्जीकरण शस्त्रक्रीया करण्यात आली.- गणेश हतकय्या,आरोग्य निरीक्षक, न.प. गोंदिया

छोटा गोंदिया परिसरासह शहरातील अन्य भागात सध्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. रात्रीला हे कुत्रे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात. मध्यंतरी काहींना चावा घेण्याची घटना ही घडली आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत राहतात.- महेश पंधराम, छोटा गोंदिया.

टॅग्स :dogकुत्रा