शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांच्या बंगल्यांची वाट झाली कठीण

By admin | Updated: May 17, 2014 23:45 IST

येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते

गोंदिया : येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते न्यायाधीश यासारखे वरिष्ठ अधिकारी राहतात. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या अधिकार्‍यांच्या घरचा रस्ता पार उखडून गेला असून येथून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आजचे चित्र बघितल्यास येथे रस्ता होता की नाही असा विचार करावा लागतो. कोणत्याही शहरातील सिव्हील लाईंस भाग म्हटला की, शहरातील वरिष्ठ अधिकारी व उच्चभ्रुंचे निवासस्थान व सर्व सुविधायुक्त असा हा परिसर असतो. चांगले रस्ते, पथदिवे, स्वच्छता आदिंची पूर्तता या भागात असते व बघता क्षणीच सिव्हील लाईंस काय याबाबत समोरच्या व्यक्तीला समजून जाते. गोंदिया शहरात मात्र विपरीत परिस्थिती आहे. येथे वरिष्ठ अधिकारी व प्रतिष्ठीतांचे निवास असले तरिही पाहिजे तशा सुविधांचा येथे अभाव आहे. रस्ते तर बघता कामा नये, पथदिवे रात्री कमी व दिवसाच जास्त प्रकाशमान होतात. स्वच्छता बघायची झाल्यास पालिकेचा स्वच्छता विभागही लाजून जाणार असा घाणीने व्याप्त परिसर आहे. त्यातही विशेष बाब अशी की, सिव्हील लाईंस परिसरात असलेल्या शहरातील एकमेव सुभाष बागेच्या शेजारीच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. बालक मंदिर मार्ग म्हणून शहरात या परिसराची ओळख आहे. येथील क्वार्टर्समध्ये उप वन संरक्षक, न्यायाधीश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, निवासी उप जिल्हाधिकारी आदींसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचे निवासस्थान आहेत. त्यांना आवागमनासाठी बालकमंदिर मार्ग हा एकच रस्ता आहे. मात्र या रस्त्याची पार दुर्गत झाली आहे. हा डांबरी रस्ता असून आजघडीला मात्र या रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याचे चित्र आहे. तर रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले असल्याने या मार्गाने ये-जा करणे एक डोकेदुखीच झाली आहे. शिवाय रस्त्यावर सफाईचा अभाव आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचर्‍यांचे ढिगार लागल्याचे चित्र. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आज या रस्त्यावर डांबरीकरणाचे नामोनिशान शिल्लक नाही. रस्ता चांगलाच उखडलेला असल्याने येथून वाहतूक करणे एक कसरत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. शहरातील सामान्य नागरिकांचा तर कुणीच वाली नाही. मात्र नगर प्रशासनाने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सोडले नाही. (शहर प्रतिनिधी)