शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलांच्या हमीभावाने खरेदीचा प्रस्ताव थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:16 IST

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील लाखोंच्या वर मोहाची वृक्ष आहेत. या वृक्षांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र मोहफुलांची हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडला आहे.

ठळक मुद्देअनेकांना मिळतो रोजगार : पूर्व विदर्भात सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील लाखोंच्या वर मोहाची वृक्ष आहेत. या वृक्षांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र मोहफुलांची हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडला आहे.गोंदिया येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने २०१३ मध्ये शासनाकडे एक प्रस्ताव पाठवून मोहाफुलांची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली होती. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या प्रस्तावर कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे मोहाफुलाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या मार्गात अडचण निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मोहाची विक्री केली जाते. ग्रामीण भागातील महिला जंगलातून मोहफुले वेचून त्याची विक्री करतात यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उरदनिर्वाह चालण्यास मदत होते. त्यामुळे धानाप्रमाणेच मोहाफुलांची हमीभावानुसार खरेदी केल्यास त्याची ग्रामीण भागातील नागरिकांना मदत होवू शकते.गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात मोहाफुलांच्या झाडांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या मोहाच्या फुलांमध्ये औषधीयुक्त गुणधर्म सुध्दा आहेत. महिला बचत गटांनी मोहाफुलापासून शरबत, जॉम, लाडू तयार करुन त्याची विक्री करण्यास सुरूवात केली आहे. याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोहाफुलांपासून तयार केले जाणारे लाडू गर्भवती महिलांसाठी सर्वाधिक पोष्टीक मानले जातात. त्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करुन मोहफुलाची शासकीय हमीभावानुसार खरेदी केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होईल. मात्र या प्रस्तावावर शासनाने अद्यापही कुठलाही निर्णय घेतला नसल्याची माहिती उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी लोकमतशी बोलताना दिली.अंगूर व संत्र्यासाठी मोहफुलांकडे दुर्लक्षराज्यात सर्वार्धिक मद्यनिर्मिती ही अंगूर आणि संत्र्यापासून केली जाते. तर यापूर्वी मोहफुलांपासून सुध्दा मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मिती केली जात होती. मात्र याचा फटका अंगूर आणि संत्रा उत्पादकांना बसत असल्याने सरकारने मोहफुल खरेदी विक्रीवर निर्बंध लावल्याचे बोलल्या जाते.