शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आढळताहेत गंध व चव न येणारे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

कोरोनाने जगाला हेलावून सोडले असून नव्यानेच मिळून आलेल्या या विषाणूबाबत कुणीही जाणत नव्हते. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाची लक्षणं सांगीतली जात होती. यामुठळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करून स्वत: ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देरुग्णांत या लक्षणांची भर, कोरोनाचा धोका आणखीच वाढला

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ताप, सर्दी व खोकला असल्यास ती कोरोना संसर्गाची लक्षण असल्याचे सांगीतले जात आहे. तर गंध व चव न येणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगीतले जात असतानाच जिल्ह्यात गंध व चव न येणारे रूग्ण आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्यात आता या लक्षणांची भर पडली असून कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.कोरोनाने जगाला हेलावून सोडले असून नव्यानेच मिळून आलेल्या या विषाणूबाबत कुणीही जाणत नव्हते. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाची लक्षणं सांगीतली जात होती. यामुठळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करून स्वत: ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाकडून कोरोना रूग्णांना शोधून काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्वेक्षणातही ताप, सर्दी व खोकला यांचीच विचारणा व तपासणी केली जात आहे. यामुळे ताप, सर्दी व खोकला नसल्याने सर्वांनाच दिलासा मिळत होता. मात्र जिल्ह्याचे टेन्शन वाढविणारी आणखी २ लक्षणे येथील रूग्णांत दिसून येत असल्याचे आता चिकित्सकांकडून माहिती होत आहे. यात नाकाला गंध न येणे तर जिभेला चव नसणे यांचा समावेश आहे. खाजगी चिकित्सकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोजच्या तपासणीत त्यांना या लक्षणांचे रूग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच, आतापर्यंत ताप, सर्दी व खोकला या लक्षणांना धरून रूग्ण शोधण्याचे जे प्रयत्न केले जात होते. त्यात या आणखी २ लक्षणांची भर पडल्याने व तसे रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.वेळीच तपासणी करण्याची गरजआतापर्यंत सर्दी, ताप व खोकला असल्यास रूग्ण स्वत:ची तपासणी करवून घेत होते. त्यामुळे रिपोर्टनुसार ते स्वत: वेगळे करून घेत किंवा भर्ती करून कोरोनाचा संसर्ग पसरवित नव्हते. मात्र आता चव न येणे तसेच गंध नसलेले रूग्ण आढळून येत असून कित्येकांना या लक्षणांबाबत माहिती नाही. अशात अजानतेपणात ते लोकांत मिसळून राहत असून कोरोनाचा संसर्ग पसरवित आहेत. ज्यांना एखाद्या पदार्थाची गंध व चव येत नसल्यास त्यांनी स्वत:ला वेगळे करून सर्वप्रथम तपासणी करून घ्यावी असे चिकित्सक सांगत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या