शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

१३ नंतर निवडणूक रद्द होणार की रंगत येणार! उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:42 IST

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १३ डिसेंबरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष उमेदवारही संभ्रमात : वेट ॲन्ड वॉचची भूमिका

गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे. तर, १३ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर, ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णयसुद्धा १३ डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे या निवडणुका रद्द होतात की निवडणुका होतात, यानंतरच यात रंगत येण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जि.प.च्या १० व पं.स.च्या २० आणि नगरपंचायतींच्या ६ ओबीसी प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

तर, ओबीसी जागा वगळून निवडणुका न घेता त्या स्थगित करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १३ डिसेंबरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुका रद्द होतात की ओबीसी जागा वगळून निवडणुका होतात, यावरच या निवडणुकांमधील रंगत कळणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १३ डिसेंबरच्या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

बंडखोरांची मनधरणी सुरू

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षातील काही सदस्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे १३ डिसेंबरपूर्वी या बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करणे सुरू असल्याचे चित्र आहे.

सर्वच निवडणूक रद्द करण्याच्या भूमिकेत

ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका घेतल्या आणि त्याचा निकाल लागला, तरी जोपर्यंत या ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी पदारुढ होणार नाही. त्यामुळे निवडून आलेले सदस्य केवळ नामधारी राहणार आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याऐवजी सर्वच निवडणुका स्थगित करून त्या एकत्रित घेण्याची मागणी केली जात आहे.

निवडणूक यंत्रणेची तारांबळ

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, ओबीसी जागा वगळून अर्जांची छाननी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेची सुद्धा तारांबळ उडाली. दाखल उमेदवारी अर्जांची संख्या आणि किती अर्ज बाद झाले याची माहिती एक दिवस उशिराने देण्याची वेळ आली तर जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम सुद्धा यामुळे वाढले होते.

राजकीय पक्षांच्या भूमिककडे लक्ष

१३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. याचा काय निर्णय लागयचा तो लागेल. मात्र, ओबीसी जागा वगळून निवडणूक घेण्याची वेळ आल्यास आता आक्रमक असलेले सर्वच राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेतात, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीOBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती