शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी या मार्गावरून दरराेज ९० गाड्या धावत हाेत्या, तर सद्यस्थितीत ...

गोंदिया : हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वेस्थानक असून, लॉकडाऊनपूर्वी या मार्गावरून दरराेज ९० गाड्या धावत हाेत्या, तर सद्यस्थितीत दररोज ४७ गाड्या धावत आहेत. यात विशेष गाड्यांची संख्या अधिक असून, या गाड्या तिरोडा, आमगाव, सौंदड, सालेकसा, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांना ३० ते ४० किमीचे अंतर गाठून रेल्वे पकडावी लागत आहे. हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला; पण त्याची अजूनही दखल घेण्यात आली नसल्यामुळे समस्या कायम आहे.

................

सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या

हावडा-मुंबई मेल

गीतांजली एक्स्प्रेस

समता एक्स्प्रेस

गोंडवाना एक्स्प्रेस

चेन्नई-बिलासपूर एक्स्प्रेस

जबलपूर-चांदाफोर्ट

अमृतसर-छत्तीसगड एक्स्प्रेस

.................................

या ठिकाणी रेल्वे थांबे कधी मिळणार

- गोंदिया जिल्ह्यातून हावडा-मुंबई आणि गोंदिया-चांदाफोर्ट हे दोन मार्ग गेले आहे. या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या बरीच आहे. मात्र अजूनही बऱ्याच एक्स्प्रेस गाड्यांना तिरोडा, आमगाव, सालेकसा, सौंदड, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकावर अद्यापही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम आहे.

- या रेल्वे स्थानकावर विशेष गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना २० ते ३० किमीचा फेरा मारुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो.

.................

विशेष गाड्यांनाच थांबा नाही

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या काही मार्गावर विशेष रेल्वे गाड्याच धावत आहेत. या विशेष गाड्या असल्याने त्यांना काही रेल्वे स्थानकांवर थांबा नाही. नियमित गाड्या सुरू झाल्यानंतर थांबे वाढविण्यात येतील.

- जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग

.............

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास

मी गोंदियाहून तिरोड्याला दररोज अपडाऊन करतो. मात्र गोंडवाना, आझाद हिंद, समता एक्स्प्रेस यासारख्या महत्त्वपूर्ण गाड्यांना थांबा नसल्याने आमची फार गैससोय होत असून, एसटीने प्रवास करावा लागत आहे.

- मनोज दमाहे, प्रवासी

............

गोंदियाहून मी अर्जुनी मोरगाव रेल्वे गाडीने प्रवास करीत होतो. मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे गाड्या बंद आहेत. तर काही विशेष गाड्या मार्गावरून जात असून, त्यांना थांबे नसल्याने अडचण होत आहे.

- मनीष गावंडे, प्रवासी

.................