शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सारस पक्ष्यांची संख्या ३५ वरुन ३८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:27 IST

सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक्ष्यांचा जिल्हा अशी होत आहे.

ठळक मुद्देपक्षीप्रेमींना दिलासा : सारसांचा जिल्हा ओळख कायम, प्रशासनाने घ्यावा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक्ष्यांचा जिल्हा अशी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या ३५ वरुन ३८ पोहचली आहे.गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात दरवर्षी विदेशी पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. त्यामुळेच देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.गोंदिया येथील सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सेवा संस्थेतर्फे दरवर्षी सारस पक्ष्यांची गणना केली जाते.मागील वर्षी जिल्ह्यात ३५ सारस पक्षी आढळले होते. तर यंदा ही संख्या ३८ वर पोहचली आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितले की मागील वर्षी गोंदिया, बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे घरटे आढळले होते.यानंतर वनविभागाच्या मदतीने सारस पक्ष्यांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामुळेच सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ करण्यास मदत होत आहे.सारस पक्षी नेहमीच जोडीने राहतात. मात्र सर्वच सारस पक्षी घरटे तयार करीत नाही. घरटे तयार करण्यापूर्वी ते सभोवतालच्या जागेचे निरीक्षण करतात. तसेच उपयोगी वनस्पती व गवत उपलब्ध असल्यानंतरच घरटे तयार करतात.कीटकांवर नियंत्रणाचे कामसारस पक्ष्यांचे नैसर्गिक महत्त्व असून कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुध्दा ते करतात. शेतातील धानाच्या मुळांना त्यांच्या दबावामुळे पोषक तत्वे मिळते. त्यामुळे ते एकप्रकारे शेतकºयांचा मित्र म्हणून सुध्दा काम करतात.गावकऱ्यांमध्ये जनजागृतीजिल्ह्यातील तलाव आणि शेतीच्या परिसरात सारस पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध घेवून सेवा संस्थेचे सदस्य त्यांच्या संवर्धनासाठी यावर नजर ठेवतात.तसेच सारस पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरातील गावकºयांना सारस पक्ष्यांची घरटी कशी असतात, त्यांचे संवर्धन कसे करायचे याबाबत मागदर्शन केले जाते.वर्षांतून एकदाच अंडी देण्याचा हंगामसारस पक्षी वर्षभरात केवळ एकदाच अंडी देतात. मागील वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी सारसची १६ अंडी आढळली होती. मात्र यापैकी दोन अंडी गायब झाली तर १४ अंडी उगविली. यातील १४ पक्षी बाहेर आले असून ते सर्व सुरक्षित असल्याचे बहेकार यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभाग