शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसादाअभावी मुक्कामी फेऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रवासाला परवानगी देण्यात आली असून पुन्हा एसटी प्रवासी सेवेत रस्त्यावर उतरली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून कोठे जायचे असल्यास स्वत:च्या खासगी वाहनानेच जाण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी आजही एसटीला पाहिजे तेवढा प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. उलट फेऱ्या चालवून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने आगारांनी आजही कित्येक फेऱ्या बंदच ठेवल्या आहेत. यामध्ये मुक्कामी असलेल्या फेऱ्यांचाही समावेश आहे. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असून जनजीवन पुन्हा सुरळीत होत असल्याने मुक्कामी फेऱ्या बंद असलेल्या गावातील नागरिकांची गैरसोय होतानाही दिसत आहे.

---------------------------

आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बसेस

आगार कोरोनापूर्वी मुक्कामी थांबणाऱ्या बसेस सध्या मुक्कामी थांबणाऱ्या बसेस

गोंदिया ३३ २२

तिरोडा १९ १२

-------------------------------

५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच

- गोंदिया आगारात ८१ बसेस असून प्रवासी प्रतिसाद नसल्याने काही फेऱ्या बंद असल्याने त्यातील ५७ बसेस सध्या सुरू आहेत.

- तिरोडा आगारात ४२ बसेस असून तेथेही प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने ग्रामीण फेऱ्या बंद असल्याने ३६ बसेस सुरू आहेत.

- अवघ्या जिल्ह्यातच एसटीला प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने आगारांनी फेऱ्या कमी केल्याने ५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच राहतात.

-----------------------------------

रुग्ण घटले, एसटी कधी धावणार ?

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आली असून नाममात्र रुग्ण उरले आहेत. मात्र तरीही ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. अशात आम्हाला प्रवासात गैरसोय होत आहे. एसटी येत नसल्याने ऑटो किंवा अन्य प्रवासी वाहनाने सोय करावी लागत आहे. एसटी सुरू झाल्यास सोयीचे होणार.

- रोहित गणवीर

------------------------------------

कोरोनामुळे आगाराने ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्या आहेत. मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून आता कामे सुरू झाली आहेत. अशात बाहेरगावी जायचे असल्यास प्रवासाची सोय नसल्याने अडचण होत आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

- सचिन चव्हाण

----------------------------------

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असला तरीही एसटीला प्रवासी प्रतिसाद कमीच आहे. यामुळेच जेमतेम डिझेल खर्च निघेल अशीच परिस्थिती आहे. करिता काही फेऱ्या आतापर्यंत बंदच ठेवल्या आहेत. परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्यांना सुरू करता येईल.

- उमेश उके

वाहतूक नियंत्रक, गोंदिया