शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रुग्ण संख्येत घट झाल्याने चाचण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ७०३२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देसंसर्ग येतोय आटोक्यात : जिल्हावासीयांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पाच महिने रुग्ण वाढीचा दर आटोक्यात होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा बाधितांचा आकडा ७६०० वर पोहचला. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मागील दहा दिवसात १८०० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली तर ६६६ नवीन बाधितांची नोंद झाली. रुग्ण संख्येत घट झाल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा घटले आहे.सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ७०३२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. १ ते १० ऑक्टोबर दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर ८७.५२ टक्के झाला असून ही निश्चित जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाण सुध्दा कमी झाले आहे. बाधित रुग्ण कमी आढळत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. सध्या एका कोरोना बाधित व्यक्तीमागे संपर्कात आलेल्या १५ लोकांची चाचणी केली जाते. कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी झाला आहे. हीच स्थिती राहिल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दररोज ५५० चाचण्यामागील दोन महिने रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने दररोज २ हजारावर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या जात होत्या. पण आता रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याने दररोज ५५० आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट केल्या जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.१० हजार कीट येणार आजकोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात येत असला तरी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्या, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने १० हजार रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट कीट मागविल्या आहेत. या कीट सोमवारी (दि.१२) आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहेत.आरोग्य विभागाची त्रीसूत्री ठरतेय महत्त्वकोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने अधिकाधिक टेस्ट करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविणे ही त्रीसूत्री अवंलबली आहे.त्यामुळे याचे चांगले परिणाम दिसून येत असून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मदत होत आहे. तसेच माझे कुटुंब माझी जवाबदारी या मोहिमेचा सुध्दा बराच फायदा झाला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या