शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बाधित, मात करणाऱ्यांची संख्या शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरली असून, बाधितांचा ग्राफ सातत्याने खाली येत आहे. सध्या जिल्ह्यात ११ कोरोना ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरली असून, बाधितांचा ग्राफ सातत्याने खाली येत आहे. सध्या जिल्ह्यात ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जुलै महिन्यात सलग सहाव्यांदा बाधित आणि मात करणाऱ्या रुग्णांची शून्य नोंद झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२६) १७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १५० स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर तर २५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. मागील आठवडाभरापासून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने, कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र आहे. कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २,१४,५४२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,८९,४४४ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,२१,६८२ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी २,००,५९२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१२८ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ४०,४७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

..................

कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्के

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.२७ टक्के असून, तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट २ टक्क्यांनी अधिक आहे.