शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या ३५ वरुन ३८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:11 IST

सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपक्षी प्रेमींना दिलासा सारसांचा जिल्हा ओळख कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक्ष्यांचा जिल्हा अशी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या ३५ वरुन ३८ पोहचली आहे.गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात दरवर्षी विदेशी पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. त्यामुळेच देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनी भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.गोंदिया येथील सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सेवा संस्थेतर्फे दरवर्षी सारस पक्षांची गणना केली जाते.मागील वर्षी जिल्ह्यात ३५ सारस पक्षी आढळले होते. तर यंदा ही संख्या ३८ वर पोहचली आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितले की मागील वर्षी गोंदिया, बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे घरटे आढळले होते.यानंतर वनविभागाच्या मदतीने सारस पक्ष्यांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामुळेच सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ करण्यास मदत होत आहे. सारस पक्षी नेहमीच जोडीने राहतात. मात्र सर्वच सारस पक्षी घरटे तयार करीत नाही. घरटे तयार करण्यापूर्वी ते सभोवतालच्या जागेचे निरीक्षण करतात. तसेच उपयोगी वनस्पती व गवत उपलब्ध असल्यानंतरच घरटे तयार करतात.

किटकांवर नियंत्रणाचे कामसारस पक्ष्यांचे नैसर्गिक महत्त्व असून किटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुध्दा ते करतात. शेतातील धानाच्या मुळांना त्यांच्या दबावामुळे पोषक तत्वे मिळते. त्यामुळे ते एकप्रकारे शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुध्दा काम करतात.

गावकऱ्यांमध्ये जनजागृतीजिल्ह्यातील तलाव आणि शेतीच्या परिसरात सारस पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध घेवून सेवा संस्थेचे सदस्य त्यांच्या संवर्धनासाठी यावर नजर ठेवतात.तसेच सारस पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरातील गावकऱ्यांना सारस पक्ष्यांची घरटी कशी असतात, त्यांचे संवर्धन कसे करायचे याबाबत मागदर्शन केले जाते.

वर्षांतून एकदाच अंडीचा हंगामसारस पक्षी वर्षभरात केवळ एकदाच अंडी देतात. मागील वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी सारसची १६ अंडी आढळली होती. मात्र यापैकी दोन अंडी गायब झाली तर १४ अंडी उगविली. यातील १४ पक्षी बाहेर आले असून ते सर्व सुरक्षीत असल्याचे बहेकार यांनी सांगितले.सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच दरवर्षी सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांची घरटी आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाने त्यांच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. त्यामुळे सारस संवर्धनासाठी मदत होईल.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य