शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांपासून स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २२) ४३६ नमुन्याची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एक नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ टक्के आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे कमी झाला असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देएक बाधिताची मात, तर एका रुग्णाची पडली भर : कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या आणि बाधित रुग्णांची संख्या सारखी असल्याने कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २२) ४३६ नमुन्याची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एक नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ टक्के आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे कमी झाला असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा शिरकाव पुन्हा जिल्ह्यात वाढणार आहे. सद्यस्थितीत केवळ ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१२८९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८७८०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रुग्णांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २२१२४७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २००१६० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११७६ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  एकंदर जिल्ह्यातील स्थिती आता नियंत्रणात असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. यामुळेच आता नागरिकांकडून नियमांना घेऊन गांभीयर्य दिसत नाही. मात्र असे असतानाही कोरोना विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

तीन तालुके कोरोनामुक्त, तर पाच तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण - कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून, पाच तालुक्यांत प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता, येत्या आठवडाभरात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या