गोंदिया : जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत गेली होती. जिल्ह्यात आतापर्यंत १४००४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी १३५९३ बाधितांनी मात केली आहे. रुग्णसंख्येला बऱ्याच प्रमाण ब्रेक लागला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ २३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१५) १५ रुग्णांची नोंद झाली तर ३५ बाधितांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेल्या १५ रुग्णांमध्ये सर्वाधिक ८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ३, आमगाव २, सालेकसा १ व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ५९९३० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४८४२६ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोराेनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६२६१७ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५६५८५ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.