शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:28 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक कामातील दिरंगाई : थेट गुन्हा दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणूक कामांत दिरंगाई केली जात असल्याने अशांना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१२) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता तयारीला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाते. त्यानुसार, सध्या मतदार यादी पुनर्रीक्षणाचे काम सुरू असून कित्येक कर्मचाऱ्यांची बीएलओ व पर्यवेक्षक म्हणून ड्यूटी लावण्यात आली आहे. मात्र संबंधीत कार्यालयातील आहे ती कामे हाताळतानाच मतदार पुनर्रीक्षण यादीसाठी ड्यूटी लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे. न.प.च्या ५ कर्मचाऱ्यांचे मतदार यादी पुनर्रीक्षण कामाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीचे काम अत्यंत महत्वपूर्ण व जबाबदारीचे असल्याने त्यात दिरंगाई करणे महागात पडते. नेमकी हीच बाब हेरून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.या नोटीसमधून त्यांनी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनीधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ नुसार गुन्हा दाखल का करण्यात येवू नये याचे स्पष्टीकरण मागीतल्याची माहिती आहे.नगर परिषद कार्यालयात शुकशुकाटनगर परिषद कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांची मतदार यादी पुनर्रीक्षण कामात बीएलओ व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच आता मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी निवडणूक कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस धाडल्याने सर्वच कर्मचारी दहशतीत आले आहेत.त्यामुळे नगर परिषदेतील कर्मचारी आपापल्या कामाला लागले असून परिणामी नगर परिषदेत शुकशुकाट दिसून येत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका