शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

न.प.ने झोपेत काढल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:43 IST

नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजाविल्याने सोमवारी (दि.२६) अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देअतिक्रमण नसलेल्यांना बजावली नोटीस : अतिक्रमण मोहिमेदरम्यान तणाव

आॅनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजाविल्याने सोमवारी (दि.२६) अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नगर परिषदेने झोपेत नोटीस काढल्या का? असा संप्तत सवाल नागरिकांनी केला. या प्रकारामुळे नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबविण्याची वेळ आली.नगर परिषदतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी अतिक्रमण स्थळांची मोजणी करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. शहरातील कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंतच्या मार्गाची मोजणी पूर्ण झाल्याने नगर परिषदेने सदर अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून सोमवार (दि.२६) पासून अतिक्रमण हटाव मोहीमेला कुडवा चौकातून सुरूवात केली. दरम्यान जुन्या टि.बी.रूग्णालयासमोरील अतिक्रमण हटविण्यात आले. याच परिसरात वनविभागाचे कार्यालय असून या कार्यालयाची सुरक्षा भिंत अतिक्रमणात येत असल्याचे सांगत नगर परिषद नगररचना विभागाने त्यांना नोटीस बजावली. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान सुरक्षा भिंत पाडण्यात आली नाही. तेव्हा इतर अतिक्रमणधारकांनी यावर आक्षेप घेतला. तसेच वन विभागाची सुरक्षा भिंत देखील अतिक्रमणात येत असून त्यांना सुध्दा नोटीस बजाविण्यात आली असल्याचा पुरावा सादर केला. तेव्हा भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाची सुरक्षा भिंत अतिक्रमण क्षेत्रात येत नसून त्यांना नोटीस कुणी बजावली असा सवाल न. प. मुख्याधिकारी चंदन पाटील यांना केला. ज्यांचे अतिक्रमण नाही त्यांना कशा नोटीस बजाविल्या असा सवाल उपस्थित केला. त्यावर नगररचना विभागाने नोटीस काढल्या असून या विभागाच्या कर्मचाºयांची ही चूक असल्याचे सांगितले. मात्र या घोळामुळे न.प.ला अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबविण्याची पाळी आली. नियमानुसार ज्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांचे अतिक्रमण काढा अशी भूमिका इतर अतिक्रमण धारकांनी घेतल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा या भागातील जागेची मोजणी करुन अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र नगररचना विभागाच्या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे न.प.ला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली.मोहिमेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्नभूमिअभिलेख विभागाने कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंत भागाची मोजणी करुन या भागातील अतिक्रमणधारकांची यादी तयार करुन नगररचना विभागाकडे पाठविली. मात्र नगररचना विभागाने यादीत समावेश नसलेल्या वन संरक्षक कार्यालय व इतर काही जणांना नोटीस बजावली. त्यामुळे मोहीमेदरम्यान अधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला अधिकाºयांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेत बाधा निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप भूमिअभिलेख विभागाच्या एका कर्मचाऱ्याने केला.मोहिमेदरम्यान दुजाभावकुडवाचौक ते एनएमडी कॉलेज परिसरातील अतिक्रमण हटविताना न.प. कडून काही अतिक्रमणधारकांना सुट देण्यात आल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. काही अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीस बजावली होती. प्रत्यक्षात मोहीमेदरम्यान त्यांचे अतिक्रमण काढले नसल्याचा आरोप केला.विभागात समन्वयाचा अभावनगर परिषद, नगररचना आणि भूमिअभिलेख या तिन विभागाच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमणीत भागाची मोजणी करुन नोटीस बजाविण्याचे काम सुरू आहे. भूमिअभिलेख विभागाने जागेची मोजणी करुन ज्यांनी शासकीय जागेवर बांधकाम केले आहे. त्यांना नोटीस बजाविण्यासाठी यादी तयार करुन नगररचना विभागाला दिली होती. मात्र नगररचना विभागाने ज्यांचे अतिक्रमण नाही अशांना सुध्दा नोटीस बजावली. त्यामुळे या विभागांमध्ये समन्वय नसल्याचे अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान दिसून आले.