शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडातून न.प.ने अडविली विकास कामे

By admin | Updated: September 25, 2016 02:33 IST

राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत.

गोपालदास अग्रवाल : भवानी मंदिर-सूरज चौक रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गोंदिया : राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत. यामुळेच भुयारी गटार योजना रद्द होवून ५० कोटींपेक्षा जास्तीचा निधी परत जाणार आहे. जनतेने ज्या नगरसेवकांना शहराला सुरळीत चालविण्याची व विकासाची जबाबदारी दिली, नगर परिषदेचे तेच पदाधिकारी शहराचा विकास रोखून बसले आहेत. यावर नागरिकांनी गांभीर्याने विचार करून शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी काम करणाऱ्यांना निवडून द्यावे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. राज्य शासनाच्या वैशिष्टपूर्ण कार्य योजनेंतर्गत १५० लाखांच्या निधीतून मंजूर भवानी चौक ते सूरज चौक रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार अग्रवाल पुढे बोलताना म्हणाले, भवानी मंदिरात वाजपेई चौक रस्ता सिमेंटीकरणासाठी दलितोत्तर योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर करण्याबाबत नगर परिषदेने ठराव घेतला नाही. मात्र जिल्हा नियोजन समितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहुतमाच्या आधारे निधी मंजूर करविला. उर्वरित सूरज चौक ते भवानी मंदिर रस्ता सिमेंटीकरणासाठी आम्ही राज्य शासनाकडून निधी आणला. मात्र राजकीय सूडातून नगर परिषद पदाधिकारी आम्ही आणलेल्या विकास कामांना अडवून बसले आहेत, असे ते म्हणाले.याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, गट नेता राकेश ठाकूर, राष्ट्रवादीचे गट नेता पंकज यादव, शिक्षण समिती सभापती शिला इटानकर, नगरसेवक दारा बैरिसाल, निर्मला मिश्रा, सीमा भालेराव, भगत ठकरानी, व्यंकट पाथरू, सुनिल भालेराव, सनी शेंद्रे, जियंदराम आयलानी, माधवदास खटवानी, नरेंद्र चांदवानी, हरीराम मोटवानी, नरेश् चावला, सुनिल छावडा, कमल लालवानी, संजू मनूजा, आनंद महावत, मुकेश् बिरीया, मुकेश नायक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)