शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता एका क्लिकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

गोंदिया : जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ४४७ शिधापत्रिकाधारकांना ९९८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दर महिन्याला स्वस्त धान्याचा पुरवठा ...

गोंदिया : जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ४४७ शिधापत्रिकाधारकांना ९९८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दर महिन्याला स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, बरेचदा माहितीअभावी शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्याची उचल करण्यापासून वंचित राहतात, तर बरेचदा त्यांच्या नावावरसुद्धा परस्पर स्वस्त धान्याची उचल केली जाते. मात्र, या सर्व तक्रारी दूर होणार असून, शिधापत्रिकाधारकांना याची माहिती मेरा रेशन ॲप डाऊनडोड करून एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे मेरा रेशन ॲप शिधापत्रिकाधारकांनी डाऊनलोड केल्यानंतर त्यावर शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या तक्रारीसुद्धा करता येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शिधापत्रिकाधारकाने स्वस्त धान्याची उचल केली किंवा नाही, त्याच्या नावावर इतरांनी तर धानाची उचल केली नाही ना, त्यांची शिधापत्रिका रद्द तर झाली नाही ना याची चाचपणीसुद्धा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. आजकाल जवळपास सर्वच जणांकडे अँड्राॅईड मोबाईल आहेत. त्यामुळे या ॲपच्या मदतीने स्वस्त धान्याची माहिती घेण्यास मदत होणार आहे.

.........

तक्रार ॲपवर नोंदवा

- मेरा रेशन ॲपवर शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या तक्रारीसुद्धा नोंदविता येणार आहेत. या ॲपसंदर्भात अद्याप जिल्हा पुरवठा विभागाला कसल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूृचना प्राप्त होताच यावरील तक्रारींचीसुद्धा दखल घेतली जाणार आहे.

- स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य देण्यास टाळाटाळ, कमी धान्याच्या तक्रारी, परस्पर धान्याची विल्हेवाट, स्वस्त धान्याची काळ्याबाजारात होत असलेली विक्री, आदीसंबंधी तक्रारी शिधापत्रिकाधारकांना या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेत.

......

कोट

मेरा रेशन ॲपच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाला कसल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त होताच याची अंमलबजावणी केली जाईल.

- डी. एस. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.

.............

क्लिकवर मिळणार ही माहिती

शिधापत्रिकाधारकांना मिळणारे धान्य, जवळपास असलेले स्वस्त धान्य दुकान, स्वस्त धान्य दुकानातून उचल केलेल्या स्वस्त धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र या संबंधीची माहिती, तसेच कोणत्या महिन्यात शिधापत्रिकेवर कोणते धान्य उपलब्ध करून देण्यात आले याची माहिती मिळणार आहे.

..............

जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकाधारक

२२३४४७

बीपीएल लाभार्थी

७८५१८

केशरी शिधापत्रिकाधारक

१४४५२९

पांढरे शिधापत्रिकाधारक

४८४२

...............