कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील सर्वच व्यवस्थापनातील शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, अशा आशयाचे पत्र शिक्षण उपसंचालकांसह गोंदियाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले होते; परंतु आदिवासी विकास विभागाच्या वतीने हे पत्र ९ एप्रिलला काढण्यात आले. एकीकडे मुख्यमंत्री व सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी आदेश लागू करण्याचे लेखी पत्र काढल्यावरसुद्धा आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुरू होती. त्यामुळे आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु १९ एप्रिलला आदिवासी विकास आयुक्त नाशिकचे हिरालाल सोनवणे व अपर आयुक्त नागपूर कार्यालयातील उपायुक्त डी.एस. कुठमेथे यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार कर्मचाऱ्यांची संभ्रमावस्था दूर झाली. यापूर्वी दिवाळीच्या सुट्यांमध्येदेखील आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटी कालावधी संपत आल्यावर सुट्यांचे पत्र काढले होते, हे विशेष. या निर्णयाचे संघटनेचे राज्याध्यक्ष डी.एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी.टी. भामरे, नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी व विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
आता आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST