शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता स्त्रिया व्यासपीठावर बोलू लागल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला.

ठळक मुद्देगायत्री इरले : भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे आज माझ्यासारख्या स्त्रियांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन सौंदडच्या सरपंच गायत्री इरले यांनी केले.त्रिरत्न बौद्ध विहार समिती श्रीरामनगर (सौंदड) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.अनावरण मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते, राजेश नंदागवळी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय लांजेवार, रत्नदीप दहिवले, जि.प. सदस्य रमेश चुºहे, सरपंच भरत पंधरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य देवचंद तरोणे, शिवदास साखरे, सुखदास मेश्राम, प्रा. सिद्धार्थ रामटेके, केवळराम रहिले, प्रा.आर.के. भगत, अनिल मेश्राम, सरपंच गायत्री इरले, सरपंच रेखा चांदेवार उपस्थित होते.या वेळी मूर्तीदाता रायवंता शंकर रामटेके आणि चित्ररेखा विलास रामटेके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन महिलांनी दोन प्रतिमा दान केल्यामुळे सर्व उपस्थित नागरिकांनी त्यांचा गौरव केला. श्रीनगर येथे बौद्ध धम्मीय फक्त चारच घरे आहेत. अशा कमी लोकसंख्येच्या गावात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी याकरिता गावकऱ्यांनी केलेले सहकार्य उल्लेखनिय असल्याचे मत मान्यवरांनी मार्गदर्शनातून व्यक्त केले. यावेळी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर अतिथींनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक पुरुषोत्तम रामटेके यांनी मांडले. संचालन कैलास रामटेके यांनी केले. आभार विलास रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी सत्यवान तिरपुडे, प्रेमराज बन्सोड, गौतम रामटेके आदींनी सहकार्य केले.