शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आता होणार नि:शुल्क मृदा परीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:23 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख शेतकऱ्यांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन देऊन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे.

ठळक मुद्देदोन लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ : कृषी सहायक जाणार धुऱ्यांवर

अंकुश गुंडावार।आॅनलाईन लोकमतगोंदिया : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख शेतकऱ्यांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन देऊन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे. तीन वर्ष हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची पोत सुधारण्यास मदत होणार आहे.रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत चालली आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य बिघडत चालले असून त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. दरवर्षी जिल्ह्याच्या सरासरी हेक्टरी उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा त्यातून भरुन निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नि:शुल्क मृदा परिक्षण करुन दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात २ लाख खातेदार शेतकरी असून या सर्व खातेदार शेतकºयांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन दिले जाणार आहे.कृषी विभागाचे कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर जावून मातीचे नमुणे घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक लिंक केले जाणार आहे. यात पारदर्शकता राहावी, यासाठी जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात २० हजार शेतकऱ्यांना मृदा परिक्षण करुन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे.हे आहेत मृदा परीक्षणाचे फायदेविविध पिकांच्या लागवडीसाठी जमिनीत कुठल्या घटकांची कमतरता आहे. त्यात नत्र, स्फूरद, पालाश, झिंक या घटकांचे प्रमाण किती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या घटकांची गरज आहे. याची माहिती मृदा परिक्षण चाचणीमुळे शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. जमिनीची आरोग्य पत्रिका तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.१८ वर्षांनंतर मिळाली प्रयोगशाळागोंदिया जिल्ह्यात मृदा चाचणी प्रयोगशाळा नसल्याने मातीचे नमुणे तपासणीसाठी नागपूर किंवा भंडारा येथे पाठवावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. परिणामी बरेच शेतकरी माती परिक्षण करण्याकडे दुर्लक्ष करित होते. मात्र तीन महिन्यापूर्वीच गोंदिया येथे मृदा चाचणी प्रयोगशाळा मंजुर करण्यात आली. या प्रयोगशाळेत आता मृदा परिक्षणाचे काम सुध्दा सुरू झाले.राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नि:शुल्क माती परिक्षण करुन दिले जाणार आहे. हा कार्यक्रम तीन वर्ष राबविण्यात येणार असून याचा दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल.- नंदकिशोर नयनवाडे,उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया.