शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली, गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

कपिल केकत गोंदिया : काहीच दिवसांपूर्वी २५ रूपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडरचे दर बुधवारी (दि.१) आणखी २५ रूपयांची वाढविण्यात आले ...

कपिल केकत

गोंदिया : काहीच दिवसांपूर्वी २५ रूपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडरचे दर बुधवारी (दि.१) आणखी २५ रूपयांची वाढविण्यात आले आहे. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९५५ रूपयांचा झाला असून सातत्याने होत असलेली दरवाढ बघता गृहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. पेट्रोल-डिझेल सोबतच अन्य वस्तूंची वाढत चाललेली महागाई आता सर्वसामान्यांना चांगलीच होरपळत आहे. अशात गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय? असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत.

--------------------------------

दर महिन्याला नवा उच्चांक (ग्राफिक्स)

दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर

१ डिसेंबर - ७४६

१ जानेवारी - ७४६

१ फेब्रुवारी - ९६२

१ मार्च - ८२०

१ एप्रिल - ८३५

१ मे - ८४५

१ जून - ८४५

१ जुलै - ८६१

१ ऑगस्ट - ९३०

१ सप्टेंबर - ९५५

---------------------------

सबसिडी किती भेटते हे भाऊ

घरगुती वापराच्या सिलिंडरवर ग्राहकांना शासनाकडून ४६ रूपये सबसिडी दिली जाते. मात्र या तुलनेत सिलिंडर ९३० रुपयांवर पोहचले होते. आता बुधवारी त्यात आणखी २५ रूपयांची वाढ झाली असून सिलिंडर ९५५ रूपयांवर पोहचले आहे. म्हणजेच, सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर जात असतानाच त्यावर दिली जाणारी सबसिडी मात्र अत्यंत मोजकीच आहे.

---------------------------

व्यावसायिक सिलिंडरही महागले

घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर भडकले असतानाच व्यावसायिक सिलिंडरचे दर सुद्धा वाढविण्यात आले आहेत. सध्या १,७९७ रूपयांचा असलेला व्यावसायिक सिलिंडर ७० रूपयांनी महागला असून त्याची किंमत आता १,८६७ रूपये झाली आहे. परिणामी एकीकडे गृहिणी संतापलेल्या असतानाच व्यापारीही सिलिंडर दरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले असून त्यांच्यातही रोष दिसून येत आहे.

------------------------------

महिन्याचे गणित कोलमडले ()

लॉकडाऊनने अगोदरच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यात सातत्याने महागाई वाढत असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता सिलिंडर ९५५ रुपयांना मिळणार आहे. सततच्या महागाईने आता घर चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सिलिंडरचे दरही कमी करावे.

- कविता चौधरी (गृहिणी)

----------

उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने मातीमोल ठरली आहे. सिलिंडरचे दर ९५५ रूपये झाले असून ते आता आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. करिता शासनाने ही दरवाढ नियंत्रणात आणावी व सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

- कल्पना देवतारे (गृहिणी)