शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण रे भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी (दि. २३) अटक केली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल देशमुख यांनासुद्धा काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता त्यांनासुद्धा ईडीने अटक केल्याने जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण? यावरून चर्चेला उधाण आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी २००५ ते २००९ आणि २००९ ते २०१४ या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी पुन्हा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले. पण माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांना अटक झाली. अनिल देशमुखांना अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे त्यांचे दौरेही नियमित सुरू झाले होते. पण अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्या संबंधांतूनच त्यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घोटाळे केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केले. त्यानंतर त्यांच्याही मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला. त्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांच्याकडे ईडीचे अधिकारी जाऊन धडकले आणि दुपारी त्यांना अटक करण्यात आली. तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रात सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप केला. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. तसेच केंद्र सरकारवर आगपाखड केली. 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकguardian ministerपालक मंत्री