शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्यांना मिळणार आता हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:51 IST

बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देजुन्या बाजार समितीत स्थानांतरण : नाममात्र शुल्कावर मिळणार सुविधा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास सध्याच्या भाजी बाजारात होणारी भाजी विक्रेत्यांची लुट थांबून त्यांचा पैसाही वाचणार आहे.सध्या भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना दुकानांसमोर आपली दुकान थाटावी लागत आहे. यासाठी मात्र दुकानदार या भाजी विक्रेत्यांकडून दुकान लावू देण्यासाठी काही ठरावीक रक्कम दररोज घेतात. शिवाय त्यांच्याकडून भाजीपालाही फुकटात घेतात. एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यांचा माल उरल्यास आपल्या दुकानात ठेऊ देण्यासाठी पैसे घेऊन त्यातूनही माल काढून घेत असल्याचे प्रकार ऐकीवात आहेत. ग्रामीण भागातून येऊन येथे भाजी विकल्यानंतर या प्रकारामुळे भाजी विके्रत्यांच्या हाती मोजकाच पैसा येतो.भाजी विक्रेत्यांचे हे शोषण थांबविता यावे यासाठी येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर भाजी बाजार स्थानांतरीत करण्याची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या डोक्यात आली. यांतर्गत येथील जुन्या बाजार समितीतील सध्याचे बांधकाम पाडून तेथे मोठे शेड तयार केले जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याला मंजुरी मिळल्यानंतर काम सुरू होणार असल्याचीही माहिती आहे.बाजार समितीत तयार करण्यात येणाऱ्या या शेडमध्ये भाजी व फळ विक्रेत्यांना नाममात्र दर आकारून दुकान लावण्यासाठी जागा दिली जाणार आहे. येथे भाजी विक्रेत्यांसाठी वीज व बसण्याची सोय करून दिली जाणार असून शिवाय त्यांच्याकडे उरलेला भाजीपाला किंवा फळ ठेवण्यासाठी बाजार समितीत व्यवस्था केली जाणार आहे. फक्त नाममात्र दर आकारून ही सोय दिली जाणार असून या पैशांतून खर्च काढला जाईल.शेड व कोल्ड स्टोरेजसाठी ४ कोटींचा निधीजुन्या बाजार समितीच्या जागेवर भाजी व फळबाजार स्थानांतरीत करण्याच्या कामाला गती मिळत असतानाच या बाजार समितीच्या जागेवर शेड व कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी वैशिष्ट पूर्ण योजनेंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध झाल्यास भाजी विक्रेत्यांची मोठी समस्या दूर होणार आहे.मेहनतीचे फळ मिळणारजुन्या बाजार समितीत भाजीबाजार गेल्याने भाजी विक्रेत्यांची होत असलेली लूट थांबणार. अशात त्यांच्या हाती चार पैसे उरणार व गावातून ये-जा करण्याची त्यांची मेहनत फलीतास येणार. पैसा हाती उरणार असल्याने त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे.