शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आता हमालांच्या मजुरीवरही डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांकडून धानाचा काटा करण्याचे पैसे शासनाकडून दिले जात असताना बºयाच केंद्रावर शेतकºयांकडून सुध्दा हमालीचे पैसे घेतले जातात. धान खरेदी केंद्रावरील हमाल दिवसभर मेहनत करुन आपले घाम गाळतात. त्यामुळे हमालीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून अपेक्षित आहे. मात्र तसे न करता हे अनुदान थेट संस्थाच्या खात्यावर जमा केले जात आहे.

ठळक मुद्देहमालीची रक्कम थेट संस्थेच्या खात्यात : खरेदी केंद्रावर जिरतोय हमालांचा घाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार नुकताच लोकमतने उघडकीस आला. त्यावर चौकशी समितीने सुध्दा शिक्का मोर्तब केले आहे. त्यानंतर आता शासकीय धान खरेदी केंद्रावरील हमालांच्या मजुरीवरही डल्ला मारला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर कार्यरत हमालाचा घामाचे दाम सुध्दा जिरविले जात असल्याची माहिती आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकºयाच्या धानाचा काटा करुन कट्टयांची छल्ली मारण्यासाठी केंद्रावरील हमालांना प्रती क्विंटल ११ रुपये प्रमाणे पैसे दिले जात जाते. धानाचा काटा करणे, शिवणे, सुतळी आणि कट्यांवर शिक्का मारणे या आदी बाबींचा समावेश आहे.शेतकऱ्यांकडून धानाचा काटा करण्याचे पैसे शासनाकडून दिले जात असताना बऱ्याच केंद्रावर शेतकºयांकडून सुध्दा हमालीचे पैसे घेतले जातात. धान खरेदी केंद्रावरील हमाल दिवसभर मेहनत करुन आपले घाम गाळतात. त्यामुळे हमालीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून अपेक्षित आहे. मात्र तसे न करता हे अनुदान थेट संस्थाच्या खात्यावर जमा केले जात आहे.आठवडाभरापूर्वीच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील काही धान खरेदी संस्थाच्या खात्यावर हमालीच्या अनुदानाची रक्कम जमा केली. एकएका संस्थेला या अनुदानापोटी प्रत्येकी आठ ते दहा लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे. ही रक्कम संस्थाच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ती केंद्रावरील हमालांना देणे अपेक्षित होते. मात्र बऱ्याच संस्थानी ही रक्कम हमालांना दिलीच नसल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे शासन प्रत्येक योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करते. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सुध्दा शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करते. मग हमालीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर का जमा करीत नाही हे एक न उलगडणारे कोडेच आहे. देवरी तालुक्यातील एका संस्थेने हमालीच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर थोडे पैसे हमालांना देऊन त्यांची व्हाऊचरवर सही घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी यास नकार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तर सडक अर्जुनी तालुक्यातील एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांने संस्थेला प्राप्त झालेल्या अनुदानाची रक्कम संबंधित हमालाना दिली जात नसल्याचे सांगितले.हमालीच्या अनुदानाची रक्कम लाखोंच्या घरातजिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे १०५ आणि आदिवासी विकास महामंडळाचे ४६ धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी करण्यात आली. यासर्व केंद्रावर काम करणाऱ्या हमालांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. प्रती क्विंटल ११ रुपये प्रमाणे हमाली शासनाकडून दिली जाते.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी केली. त्यामुळे एकएका संस्थेला हमालीच्या अनुदानाची मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली. या रक्कमेची गोळा बेरीज हा आकडा लाखो रुपयांच्या घरात आहे. मात्र याची चौकशी करणार कोण आणि हमालांना त्यांच्या हक्काचा दाम कोण मिळवून देणार असा प्रश्न कायम आहे.अहवाल प्राप्त मग कारवाईस विलंब काशासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याची बाब जिल्हाधिकाºयांनी नेमलेल्या चौकशी समितीने पुढे आणली आहे. या संबंधिचा अहवाल सुध्दा सादर करण्यात आला आहे. मग यातील दोषींवर कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे हे मात्र समजण्यापलिकडे आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड