शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

आता रेल्वस्थानकाचे नाव स्थानिक भाषेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज मराठीतून करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्यापही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्त्य साधून रेल्वे तिकिटावर रेल्व स्थानकाचे नाव मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ मे ...

ठळक मुद्देरेल्वमंडळाचा निर्णय : १ मे पासून अंमलबजावणीस सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज मराठीतून करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्यापही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्त्य साधून रेल्वे तिकिटावर रेल्व स्थानकाचे नाव मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ मे महाराष्ट्र दिनापासून करण्यात आली.भाषा ही त्या परिसराची आणि संस्कृतीची खरी ओळख असते. भाषेचा सन्मान वाढविण्यासाठी आणि तिला अधिक वाव देऊन त्या त्या राज्यात तिला अधिक पोषक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाने घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेचा अधिक गौरव करण्यासाठी आता रेल्वे तिकिटावर रेल्वे स्थानकाचे नाव इंग्रजी व हिंदीसह मराठी भाषेत छापले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची देखील सोय होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणातंर्गत महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकाची नावे आता तिकिटावर स्थानिक भाषेत म्हणजेच मराठी छापण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रेल्वे तिकिटावर केवळ हिंदी आणि इंग्रजीत रेल्वे स्थानकाचे नाव छापले जात होते. मात्र स्थानिक भाषेचा सन्मान करण्यासाठी आणि भाषेला वाव देण्यासाठी रेल्वे स्थानकाचे नाव तिकिटावर मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. याची १ मे पासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाने अंमलबजावणी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकावर युटीएस (अनारक्षित तिकिट) प्रणाली अंतर्गत आता सर्व अनारक्षित तिकिटावर रेल्वे स्थानकाचे नाव हिंदी व इंग्रजीसह स्थानिक भाषेत असणार आहेत. यासंबंधीच्या सूचना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य मंडळ व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांनी दिले आहेत. त्यामुळे रेल्वे विभाग या उपक्रमात किती दिवस सातत्य ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.