शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हास्तरावर सुरू होणार मानसिक आरोग्य कार्यक्रम

By admin | Updated: May 15, 2014 23:42 IST

डोळ्यांनी न दिसणारे मन हे अतिसुक्ष्म असते. मात्र प्रगट शरीराप्रमाणे मनालाही अनेक व्याधी होतात. शरीराचे आजार दूर केले जावू शकतात,

देवानंद शहारे - गोंदिया

डोळ्यांनी न दिसणारे मन हे अतिसुक्ष्म असते. मात्र प्रगट शरीराप्रमाणे मनालाही अनेक व्याधी होतात. शरीराचे आजार दूर केले जावू शकतात, पण मनाचे नियंत्रण नष्ट झाले, मनाला व्याधी जडल्या तर माणसाची गनणा वेड्यात होते. त्यामुळे मनाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आता मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविला जाणार आहे.

मोठमोठय़ा शहरात मनाच्या उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकृती तज्ज्ञ सहज उपलब्ध होतात. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात हे तज्ज्ञ नसतात. त्यामुळे मनाच्या उपचारासाठी आर्थिक फटका व मोठा त्रास सहन करून शहराकडे धाव घ्यावी लागते. गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात मनोविकृती तज्ज्ञ कार्यरत आहे. शिवाय दुर्गम भागात मानसोपचार सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे, अशा आशयाचे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांचे पत्र १४ मे २0१३ रोजी गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात धडकले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. केंद्राने सदर प्रस्ताव मंजूर केला असून राज्य शासनाची मंजुरी घेवून सदर कार्यक्रम सुरू करण्यात यावा, असे कळविले आहे. त्यानुसार २२ एप्रिल २0१४ रोजी आयुक्त, कुटूंब कल्याण व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

मंजुरी येताच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मंजूर पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे सदर प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. यासाठी सात पदांची गरज असून यात दोन प्रशासकीय अधिकारी व पाच सदस्यांच्या तांत्रिक चमूचा समावेश असेल. मंजुरी मिळताच ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यात एक कार्यक्रम अधिकारी (मानसोपचार तज्ज्ञ) वैद्यकीय अधिकारी, एक मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, एक मानसोपचार परिचारिका (प्रशिक्षित), एक रेकॉर्ड किपर, एक कॅाम्युनिटी नर्स (प्रकरण व्यवस्थापक) व एक प्रकरण नोंदणी सहायक या सात जणांची चमू कार्यरत राहणार आहे.

सायकोसोमेटिक’, अर्थात मनोशरीर-शरीरमन. मन हे अदृष्य शरीर तर शरीर हे दृष्य मन. शरीराचे परिणाम मनाला भोगावे लागतात, तर मनाचे परिणाम शरीरावर दिसतात. मानवी शरीराच्या औषधोपचारासाठी अनेक रूग्णालये आहेत. त्या तुलनेत मनाच्या औषधोपचाराची रूग्णालये कमी आहेत. त्यासाठी शासनाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला आहे. या मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (डीएमएचपी). हा कार्यक्रम आता गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात लवकरच सुरू होणार आहे.