शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गावाला आता आस सिंचनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:04 IST

तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही.

ठळक मुद्देपाथरीचा कायापालट : विकास कामाने बदलतोय गावाचा चेहरा मोहरा

दिलीप चव्हाण ।आॅनलाईन लोकमतगोरेगाव : तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची अपेक्षा होती. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्त घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्न पडू लागली. या विकासातील एक भाग म्हणून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची आस आहे. सिंचनाची व्यवस्था झाल्यास येथील शेतकऱ्याच्या हाताला काम अन् घामाला दाम मिळू शकेल.पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. गावातील सामाजिक पार्श्वभूमि चांगली आहे. गावाच्या मध्यभागी प्राथमिक शाळा मन मोहून घेते. लहानशी शाळा, पण शाळेचा परिसर म्हणजे श्रावणातील हिरवा गालीचा गावातील मुख्य चौकातील बस स्थानकावर मनमोहक दृश्यातून महात्मा गांधी यांचे तीन बंदर लक्ष केंद्रीत करतात. बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो हा मुलमंत्र जनूकाही या गावाने स्विकारला असावा. ही जाणीव या गावात गेल्यावर होते. गावात प्रवेश केल्यावर ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावलेले फलक या गावातील नागरिकांचा स्वभाव दर्शवितात. येथील बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना पोट पाण्यासाठी गाव सोडून जावे लागते.कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देवूनही या प्रकल्पाचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले आहे. कटंगी प्रकल्प सखल भागात असून येथील शेतजमीन उंच आहे. त्यामुळे इथे शेतीला पाणी मिळत नाही. हिच खरी खंत शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितली. मात्र लिफ्ट करुन (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेतीला द्यावे अशी शेतकरी आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे.शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरी, भुताईटोला येथील शेतकरी रब्बी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील.विकासात कामात अग्रेसरशंभर टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला २००५ या वर्षी निर्मल ग्राम पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील बगीचा, चिमुकल्यांसाठी विविध खेळणी, ग्रामपंचायती आवारातील सौंदर्याने नटलेला परिसर गाव विकासातील बोलके चित्र आहे. पाथरी गावात आजपर्यंत १४ व्या वित्त आयोग, ठक्कर बाबा योजना माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निधीतून बरीच विकासाची कामे, २ हजार वृक्ष लागवड, व्यायाम शाळा, एमआयडीसीमध्ये शंभर दिवस काम, मत्स्यपालन, शोष खड्डे इत्यादी विकास कामे झाली आहेत. पाथरी येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून लघु उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी ३०० शेतकऱ्यांना व २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे खासदार प्रफुल पटेल यांच्या निधीतून व त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. यातून समाजमंदिर, विहीर तोंडी, रस्ते, नाल्या, स्मशानशेड व इतर विकासाची कामे करण्यात आली. तर प्रफुल पटेल यांच्या वाढदिवशी पाथरी येथे दरवर्षी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला, कृषी मेळाव्याचे आयोजन केले जाते.