शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता घरगुती बैठकांना उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 00:46 IST

नगर परिषद निवडणुकीचा ज्वर वाढला असून प्रचाराच्या रणधुमाळीने शहर दणाणून गेले आहे. असे

गल्लोगल्ली आयोजन : उमेदवार घरोघरी गोंदिया : नगर परिषद निवडणुकीचा ज्वर वाढला असून प्रचाराच्या रणधुमाळीने शहर दणाणून गेले आहे. असे असताना आता मात्र उमेदवारांच्या घरगुती बैठकींना उधान आले आहे. गल्ली-गल्लीतील लोकांच्या घरात बैठका घेऊन उमेदवार मतदारांशी जवळील साधत आहे. त्यामुळे उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जावून भेटी घेत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी शहरात बघावयास मिळत आहे. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी य कालावधीत कधी घरोघरी जाऊन तर कधी रॅलीतून मतदारांची भेट घेतली आहे. शिवाय प्रचारकार्यही जोमात सुरू असून उमेदवार मतदारांच्या सतत नजरेसमोर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठीच जमेल त्या प्रकाराचा अवलंब उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र आता मतदानासाठी जेमतेम एकच दिवस उरला आहे. त्यामुळे उमेदवार दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त उमेदवारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक जसजशी जवळ-जवळ येत आहे. तसतशी उमेदवारांची धावपळ वाढली आहे. त्यात पक्षांचे वरिष्ठ नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठका घेत आहेत. यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. यातून काही वेळ काढून आपल्या लोकांची भेट घेण्यासाठी उमेदवार घरगुती बैठकांचे आयोजन करीत आहेत. यासाठी एखाद्या गल्लीतील काही घरांच्या महिलांची तसेच पुरूषांची बैठक घेऊन त्यांची भेट घेऊन मतांचा जोगवा मागीतला जात आहे. याबैठकीसाठी आपल्या जवळील व्यक्तीच्या घरीच सर्वांना एकत्र केले जात आहे. सध्या अशा या घरगुती बैठकांनाच जोम आला आहे. या भागातील बैठक आटोपली की लगेच दुसऱ्या भागात बैठकांचे आयोजन सुरू आहे. उरलेल्या दिवसांत मतदारांसोबत काही वेळ बसून उमेदवार मतांचे राजकारण करीत आहेत. प्रचारकार्य सध्या सर्वच उमेदवारांचे सुरू आहे. मात्र लोकांच्या मधात बसून त्यांच्यासोबत बोलचाल करून त्यांचे मत आपल्याकडे पाडून घेण्यासाठी हा नवा फंडा उमेदवार अवलंबीत आहेत. सर्व सुविधा उमेदवारांक डून ४या घरगुती बैठकीसाठी सर्व सुविधा उमेदवाराकडून पुरविल्या जात आहेत. फक्त बैठकीची जागा ठरल्यावर उमेदवाराचे कार्यकर्ते बैठकीच्या जागेची साफसफाई करण्यापासून बसण्याची व्यवस्थाही करीत आहेत. शिवाय बैठकीत आलेल्या लोकांच्या चहा व नाश्त्याचीही व्यवस्था उमेदवार करीत आहेत. ही सर्व धडपड फक्त मतांसाठी असून लोकांशी जवळीक साधण्याचा हा उत्तम फंडा असल्याने उमेदवारांचा जोर आता याकडे जास्त दिसत आहे. भाजपचे तीन पदाधिकारी निष्कासित ४गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्र्वभूमिवर पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या भाजपाच्या ३ पदाधिकाऱ्यांवर निष्कासनाची कारवाई जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. निष्कासीत केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंदियातील एजाज खान पठान, तिरोड्यातील वनमाला डहाके व सुनील येरपुडे यांचा समावेश आहे.