शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक मिठाई ट्रे समोर असेल ‘बेस्ट बिफोर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते.

ठळक मुद्देनियम न पाळल्यास होणार कारवाई : १ ऑक्टोंबरपासूनच अमंलबजावणी, अन्न व औषध प्रशासन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिठाई निकृष्ट दर्जाची दिली, जुनी दिली, त्यात किडे आढळले किंवा मिठाई खाल्यानंतर विषबाधा झाली अशी अनेक प्रकरणे आपल्या कानावर पडली आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी तसेच ग्राहकांना ती मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी तारीख म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनानचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी या संदर्भात पत्र काढले आहे. या नियमाची अमंलबजावणी १ ऑक्टोंबरपासून न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते. अशी अनेक उदाहरणे समोर येतात. परंतु या प्रकारासंदर्भात एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला म्हटल्यावर ते आपला हात झटकतात. हे होऊ नये यासाठी आता प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व मिठाई उत्पादक विक्रेत्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रेववर ‘बेस्ट बिफोर’ ठळक अक्षरात लिहिणे १ ऑक्टोंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.मिठाई किती दिवस खाण्यायोग्य याची मिळेल माहितीअन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारी नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी दिनांक १ आॅक्टोबर २०२० पासून महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ग्राहकांना ती मिठाई किती दिवसपर्यंत खाणे योग्य राहते याची कल्पना येईल. त्यामुळे अन्न विषबाधा सारख्या अप्रिय घटना टाळता येऊ शकतील.या नियमासंदर्भात सर्व दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व मिठाई विक्रेत्यांनी या तरतूदीचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांच्याविरूद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.-अभय देशपांडे,सहाय्यक आयुक्त अन्न भंडारा/गोंदिया.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा