शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टिंग’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:57 IST

घरी निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून खत निर्मितीचा नवा प्रयोग नगर परिषद करीत आहे.‘होम कम्पोस्ट’ या प्रयोगांतर्गत नगर परिषदेने आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टींग’ कार्यशाळा सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देनगर परिषदेचा उपक्रम : कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरी निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून खत निर्मितीचा नवा प्रयोग नगर परिषद करीत आहे.‘होम कम्पोस्ट’ या प्रयोगांतर्गत नगर परिषदेने आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टींग’ कार्यशाळा सुरू केल्या आहेत. यात, नगर परिषदेकडून शहरातील प्रत्येकच प्रभागात कार्यशाळा घेऊन नागरिकांना याबाबत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले जात आहे.घरात निघणारा कचरा रस्त्यावर टाकला जात असून त्यातूनच रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग पडले आहेत. यामुळे एकतर वातावरण प्रदूषीत होते, शिवाय शहर ही घाण होत आहे. या सर्वांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशात घरात निघणाऱ्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावल्यास वातावरण दूषीत होणार नाही तसेच शहरही स्वच्छ राहणार. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘होम कम्पोस्ट’ हा नवा प्रयोग अंमलात आणला जात आहे. हा प्रयोग व्यापक तत्वावर अंमलात आणला गेल्यास नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. शहरात दररोज कचऱ्याची उचल केली जात असतानाही बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार दिसून येतात.यावरून शहरातील कचऱ्याच्या समस्येची तीव्रता दिसून येते. शहरवासीयांनी आपल्या घरातील कचऱ्यावर घरातच प्रक्रीया केल्यास त्यापासून खत निर्मितीकरून कचऱ्याची समस्या सोडविता येवू शकते. नेमकी हीच बाब हेरून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून आता शहरातील प्रभागांत जावून तेथील नागरिकांना‘होम कम्पोस्ट’चे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे.यात स्वच्छता विभागाचे कर्मचारी चौका-चौकांत कार्यशाळा घेत आहेत. यामाध्यमातून नागरिकांना ‘होम कम्पोस्ट’ अंतर्गत घरातील कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकातून देत आहेत.बचत गटांनाही दिले प्रशिक्षणविविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे कार्य महिला बचत गटाद्वारे केले जात आहे. कचऱ्यापासून खत निर्मितीकरून त्यातून आर्थिक उत्पन्न कसे मिळविता येणार याबाबत महिला बचत गटांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. सेंद्रीय खताला चांगली मागणी असून आपल्या घरातील पालेभाज्या व सुका कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास त्यापासून बचत गटांना उत्पन्न मिळणार आहे.